मोदींच्या हस्ते वाढवण बंदराच भूमिपूजन...
मोदींच्या हस्ते वाढवण बंदराच भूमिपूजन...
मच्छीमारांनी होड्याना काळे झेंडे व फुगे लावून व्यक्त केला निषेध
पालघर : एका बाजूला देशाचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या वाढवण बंदराच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भूमिपूजन होणार असताना दुसरीकडे मात्र स्थानिक मच्छीमार आणि भूमिपुत्रांनी या विनाशकारी बंदराला विरोध केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराचा भूमिपूजन सोहळा सिडको मैदानात होणार असताना प्रस्तावित बंदराला
विरोध करण्यासाठी पालघरला चाललेल्या स्थानीक आंदोलकांना पोलिसांनी त्या भागातच रोखल्या मुळे स्थानिक भूमिपुत्र आणि मच्छीमारांकडून समुद्रामध्ये आपल्या बोटीना काळे फुगे लावण्यात आले होते तसेच काही बोटींवर काळे झेंडे लावुन आंदोलनाला सुरवात केली होती. धाकटी डहाणू गावातील मच्छीमार बांधवांनी वाढवण बंदराच्या भूमिपूजनाविरोधात निषेधार्थ काळे झेंडे, काळे फुगे बोटीवर लावून रॅली काढली होती.
याचबरोबर एका बाजूला वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला मात्र विरोधी संघटना आणि महाविकास आघाडी ही आक्रमक झाली होती .पालघरच्या वरोर - वाढवण येथे वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीसह वीस पेक्षा अधिक संघटनाने एकत्र येत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकार, राज्य सरकार आणि जेएनपीएची अंत्ययात्रा काढली . पंधरा हजारांपेक्षा जास्त पोलीस फौज फाटा घेऊन आज मोदी आले आहेत ते भूमिपूजन करून निघून जातील पण बंदराचं काम त्यांना वाढवण भागात करायच आहे ते आम्ही कदापि होऊ देणार नाही असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे आमदार विनोद निकोले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा यांनी दिला आहे .
◾वाढवण बंदरामुळं मच्छीमार समाज उध्वस्त होणार आहे. वडिलोपार्जित व्यवसायाला मूकणार आहेत . पालघरमध्ये वाढवण येथे जे बंदर होणार आहे तो मच्छीमारांसाठी गोल्डन बेल्ट आहे. प्रत्यक्ष ते अप्रत्यक्षपणे लोकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्याचबरोबर 1996 पासून वाढवण बंदराचा घाट शासनाकडून घातला जात आहे. आज भूमिपुजनाचा कार्यक्रम होत आहे त्याचा आम्ही काळे झेंडे दाखवून निषेध करत आहोत, असं मच्छीमारांनी म्हटले.

Comments
Post a Comment