घरफोडी-चोरीच्या गुन्ह्यातील अट्टल चोरट्याना पकडण्यात बोईसर पोलिसांना यश...
घरफोडी-चोरीच्या गुन्ह्यातील अट्टल चोरट्याना पकडण्यात बोईसर पोलिसांना यश... बोईसर : बोईसर पोलीस ठाण्यातील भा.दं. वि.सं कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हयातील चोरीचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपीना पकडण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे शादावल इम्प्रेशनमध्ये सरावली (बोईसर ) राहणाऱ्या निखिल कनाजिया यांच्या घरातून चोरट्याने २,९७,५००/- रुपयांचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा फिर्याद दाखल झाल्यानंतर सीसीटिवी फुटेजच्या माध्यमातून बोईसर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी मानखुर्द (मुंबई ) येथील सराईत गुन्हेगार अब्दुल जमीर पठाण (वय ४३) याला गुन्ह्याचा तांत्रिक दृष्टया तपास करुन आरोपीस सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता दिवा, शिळफाटा येथील संजय रत्नेश कांबळे ऊर्फ सलीम कुबड्या आणि रॉनी जोसेफ फर्नाडिस यांच्या मदतीने चोरी केल्याचे कबूल केले.अब्दुल आणि संजय यांना अटक करण्यात आली असून रॉनी फरार आहे. या आरोपींनी अश्याच प्रकारचे घर फोडीचे गुन्हे मुंबई, नवी मुंबई आणि रायगड परिसरातही चोरी केल्याची कबुली दिली आहे. प्रस्...