डोंबिवली एमआयडीसी स्फोटात कंपनी मालकावर अटकेची कारवाई..

डोंबिवली एमआयडीसी स्फोटात कंपनी मालकावर अटकेची कारवाई..

कंपनीचे संचालक, व्यवस्थापक, देखरेख अधिकाऱ्यांसह इतर बेजबाबदार व्यक्तींच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल


डोंबिवली :  डोंबिवली एमआयडीसीच्या फेज दोनमधील मे. अमुदान केमीकल्स कंपनीमध्ये गुरूवारी झालेल्या रिअक्टरच्या स्फोटात ८ जणांचा बळी गेला आहे. जीवित व वित्तहानीच्या या दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्या कंपनीच्या बेजबाबदार मालकावर ९ ठाण्याच्या क्राईम ब्रँचसह स्पेशल टास्क फोर्सने मलया प्रदीप मेहता (वय ३८) कंपनी मालकावर अटकेची कारवाई केली. तर त्याची आईलाही नाशिकमधून ताब्यात घेतले आहे. मलया प्रदीप मेहता  घाटकोपर येथील आर मॉलजवळ असलेल्या कल्पतरू आवरा सोसायटीत राहणारा आहे.

मानपाडा पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक रामचंद्र चोपडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून कंपनीच्या मालकीण मालती प्रदिप मेहता, मुलगा मलय मेहता यांच्यासह कंपनीचे संचालक, व्यवस्थापक, देखरेख अधिकाऱ्यांसह इतर बेजबाबदार व्यक्तींच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक पोलिसांसह २ ठाण्याच्या क्राईम ब्रँचच्या अपर पोलिस आयुक्त पंजाबरावउगले, पोलिस उपायुक्त पराग मणेरे आणि शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे सहाय्यक पोलिस आयुक्त निलेश सोनवणे, स्पेशल टास्क फोर्सचे सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर बागडे, पोलिस निरीक्षक वनिता पाटील, सपोनि सुनील तारमाळे, सपोनि श्रीकृष्ण गोरे, फौजदार विजय राठोड, आदींच्या पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला होता. या पथकाने तपासचक्रांना वेग देऊन मलया मेहता याला अटक केली.


कंपनीत स्फोट झाल्यानंतर मुख्य आरोपी असलेल्या कंपनीच्या मालकीण मालती प्रदीप मेहता (70) सायंकाळी ९ नाशिकला गेल्या. ९ नाशिकमध्ये त्यांनी नातेवाईकांच्या घरी आश्रय घेतला होता. तथापी क्राईम ब्रँचने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माग काढत या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मालती मेहता यांना ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवारी सकाळी करण्यात आली. सद्या या दोघा माय-लेकाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीनंतर या दोघा माय-लेकाला मानपाडा पोलिसांच्या हवाली करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी