कलश बार अन्ड रेस्टॉरंटच्या बेकायदेशीर चिमणीने उडविली नागरिकांची झोप...
कलश बार अन्ड रेस्टॉरंटच्या बेकायदेशीर चिमणीने उडविली नागरिकांची झोप...
बोईसर : सरावली ग्रामपंचायत हद्दीतील ओस्तवाल एम्पायर येथिल शिवम अपार्टमेंट मध्ये असलेल्या कलश बार अन्ड रेस्टॉरंटच्या चिमणीमुळे जेष्ठ नागरिक त्रस्त झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या कलश बार अन्ड रेस्टॉरंट कडून बसविलेल्या चिमणीच्या कर्कश आवाजाने जेष्ठ नागरिकांचे जगण कठीण झाले असून आरोग्यास परिणाम होऊ लागला आहे.
कलश बार अन्ड रेस्टॉरंटच्या दर्शनीय भागात दोन गाळे व मागिल बाजूस लागूनच असलेला रहिवास सदनिकाची तोडफोड करून किचन तयार करून बेकायदेशीर चिमणी लावली आहे त्याच बरोबर त्या चिमणी मधून ऑईल निघत असुन येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावे लागते याबाबत बार मालकाला वारंवार तोंडी तक्रार करून देखील दखल घेत नाही तसेच बार मालकासोबत सोसायटी पदाधिकारी सामील असल्यामुळे सोसायटीच्या रहिवाशांना वाली कुणी आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या कलश बार अन्ड रेस्टॉरंट कडून बसविलेल्या चिमणीच्या आवाजाने जेष्ठ नागरिकांची झोप उडालेली असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाला वारंवार सांगून ही खुर्ची गरम करून चिरीमिरीत गुंतलेले प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी मात्र झोपेचे सोंग घेऊन पोलीसात तक्रार करण्याचा सल्ला दिल्याचे तक्रारदार सुरेश गंगाधर संखे यांनी बोलताना सांगितले आहे.
Comments
Post a Comment