चिंचणी ग्रामपंचायती कडून घर दुरूस्ती नाहरकत दाखला घेत केले नविन इमारतीचे बांधकाम....

चिंचणी ग्रामपंचायती कडून घर दुरूस्ती नाहरकत दाखला घेत केले नविन इमारतीचे बांधकाम....

बेकायदेशीर बांधकाम सुरू असताना चिंचणी ग्रामविकास अधिकाऱ्याची बघ्याची भूमिका


डहाणू : डहाणू तालुक्यातील नेहमीच वादग्रस्त ठरलेली चिंचणी ग्रामपंचायत हद्दीतील मार्केट परिसरात उदय धिरजलाल पारेख यांनी घर क्रमांक २८५, ३०४, ३०५  मोडकळीस आले असल्याचे बहाना करत घर दुरूस्ती कामी नाहरकत दाखला घेत चक्क चार मजली इमारतीचे बांधकाम केले आहे.


उदय धिरजलाल पारेख यांनी घर मोडकळीस आले असल्याचे बहाना करत दिनांक १० एप्रिल २०२३ रोजी घर दुरूस्ती कामी नाहरकत दाखला घेण्यासाठी अर्ज दाखल केल्यानंतर त्याच दिवशी दुपारी ३ वाजता नियोजित मासिक सभेत ठराव क्रमांक २२५/६ नुसार घर दुरूस्ती कामी नाहरकत दाखला देण्यात आलेला आहे.


दिनांक १५ मे २००६ रोजी उदय धिरजलाल पारेख यांचा मृत्यू झाल्यानंतर वारस पत्नी लिना उदय पारेख मुलगा निकेत उदय पारेख व इतर यांच्या नावाने झाल्यानंतर गावठण जमीन विकण्यासाठी घर दुरूस्तीचा बनाव करत मयत उदय धिरजलाल पारेख यांच्या नावाने अर्ज तयार करून घर दुरूस्ती कामी नाहरकत दाखला घेण्यात आला.


सदर ठिकाणी मोडकळीस आलेल्या घराची कुठल्याही प्रकारची दुरूस्ती न करता जुने घर भूईसपाट करत चक्क चार मजली इमारतीचे बांधकाम केलेले आहे.


सदर बांधकाम करताना नगररचना विभागाकडून आराखडा मंजुरी घेण्यात आलेला नसून जिल्हा प्रशासनाकडून देखील बांधकाम परवानगी घेण्यात आलेली नाही.


चिंचणी मार्केट परिसरात येताना जाताना रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहतूकदारांशी हुज्जत घालावी लागत असून या इमारतीचे बांधकाम करताना तळ मजल्यावर व्यावसायिक स्वरूपाचे दुकानाचे बांधकाम केलेले असून वाढत्या वाहतूक कोंडीची समस्या अधिकच वाढणार आहे.


दरम्यान चिंचणी ग्रामपंचायतीकडून घर दुरूस्ती कामी नाहरकत देताना अनुक्रमे  १ ते १२ अटी शर्ती लावून ना हरकत दाखला देण्यात येतो परंतु या ठिकाणी ना हरकत दाखला प्रमाणे बांधकाम नसताना देखील या बांधकामांवर कारवाई करण्यास चिंचणी ग्रामपंचायतीकडून चालढकल केली जात आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शासनाची भूमिका स्पष्ट करणारे ग्रामविकास अधिकारी  मिलिंद गायकवाड आपले शासकीय नोकरी या बांधकामदारकासाठी व्यर्थ घालवत आहे का ? ग्रामविकास अधिकारी मिलिंद गायकवाड यांनी आजतागायत वरिष्ठ पातळीवर अहवाल का पाठविले नाही ? असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी