घरफोडी-चोरीच्या गुन्ह्यातील अट्टल चोरट्याना पकडण्यात बोईसर पोलिसांना यश...

घरफोडी-चोरीच्या गुन्ह्यातील अट्टल चोरट्याना पकडण्यात बोईसर पोलिसांना यश...


बोईसर : बोईसर पोलीस ठाण्यातील भा.दं. वि.सं कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हयातील चोरीचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपीना पकडण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे

शादावल इम्प्रेशनमध्ये सरावली (बोईसर ) राहणाऱ्या निखिल कनाजिया यांच्या घरातून चोरट्याने २,९७,५००/- रुपयांचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा फिर्याद दाखल झाल्यानंतर सीसीटिवी फुटेजच्या माध्यमातून बोईसर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी मानखुर्द (मुंबई ) येथील सराईत गुन्हेगार अब्दुल जमीर पठाण (वय ४३) याला गुन्ह्याचा तांत्रिक दृष्टया तपास करुन आरोपीस सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता दिवा, शिळफाटा येथील संजय रत्नेश कांबळे ऊर्फ सलीम कुबड्या आणि रॉनी जोसेफ फर्नाडिस यांच्या मदतीने चोरी केल्याचे कबूल केले.अब्दुल आणि संजय यांना अटक करण्यात आली असून रॉनी फरार आहे. या आरोपींनी अश्याच प्रकारचे घर फोडीचे गुन्हे मुंबई, नवी मुंबई आणि रायगड परिसरातही चोरी केल्याची कबुली दिली आहे. प्रस्तुत गुन्हयातील चोरी झालेल्या मुद्देमालापैकी २,०४,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्ती पंचनामा अंतर्गत जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्हयात कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसताना केवळ सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्याच्या आधारे अणि तांत्रिक दृष्टया कौशल्यपुर्ण तपास करुन आरोपीतांना ताब्यात घेवुन गुन्हा उघडकीस आणला आहे. तरी सदर गुन्हयातील पाहिजे आरोपीत याचा लवकरात लवकर शोध घेवुन त्यांना नमुद गुन्हयाचे कामी अटक केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक विठ्ठल मणिकेरी हे करीत आहेत.


सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिरीश पवार यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल मणिकेरी, पो ह विजय दुबळा, राहुल पाटील, शरद सानप, पो ना योगेश गावित, रमेश पालवे पो अं दिरज शाळुंके, देवेंद्र पाटील, मयूर पाटील, मच्छिंद्र घुगे, सागर जाधव या पथकाने कारवाई करून आरोपीस जेरबंद केले आहे

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी