पालघर जिल्ह्यात ३० मे ते १ जून पर्यंत उष्ण व दमट वातावरण राहण्याचा इशारा

पालघर जिल्ह्यात ३० मे ते १ जून पर्यंत उष्ण व दमट वातावरण राहण्याचा इशारा


पालघर : भारतीय हवामान विभागाने २७ मे रोजी प्रसारित केलेल्या मॉन्सूनचा दीर्घकालीन हवामान अंदाजानुसार जून ते सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रासह पालघर जिल्ह्यातही सरासरी पेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यासोबत जूनमध्ये पालघर जिल्ह्यात सरासरी एवढेच किंवा सरासरी पेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या उपसगरातील रेमल चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर २८ मे पासून अरबी समुद्रात मॉन्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून मॉन्सूनने अरबी समुद्राचा काही भाग व्यापत पुढे वाटचाल केली आहे. २९ मे रोजी प्रादेशिक हवामान विभाग मुंबई द्वारे प्रसारित केलेल्या हवामान अंदाजानुसार मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पुढील चार दिवस किमान व कमाल तापमान वाढुन उष्ण व दमट वातावरण राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील सरासरी कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस, आणि किमान तापमान २८ ते २९ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे, तसेच वाऱ्याची गती सरासरी १९ ते २० किमी प्रति तास राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामान अंदाजानुसार सतर्कता बाळगून योग्य ती काळजी घ्यावी. अशी माहिती कृषि विज्ञान केंद्र, जिल्हा कृषि हवामान केंद्र, कोसबाड हिल येथील कृषि हवामान शास्त्रज्ञ् रिझवाना सय्यद यांनी दिली. 

पुढील पाच दिवस वातावरण उष्ण व दमट राहण्याची शक्यता असल्याने उन्ह आणि उकाडा जास्त राहील, त्यामुळे शेतकऱ्यानी दुपारच्या वेळी शेतातील मशागतीची कामे करणे टाळावे. पिकांना शक्यतो संध्याकाळी किंवा सकाळच्या वेळी पाणी द्यावे. जनावरांनाही थंड व दिवसातून ३-४ वेळा पाणी द्यावे. दुपारच्या वेळी त्यांना सावलीत किंवा सुरक्षित गोठ्यात बांधण्याची व्यवस्था करावी जेणेकरून ते उष्मा घातासारख्या आजाराला बळी पडणार नाहीत. वाऱ्याचा वेग जास्त राहणार असल्याने नवीन फळ बागेतील झाडांना काठीचा आधार देवून बांधावे. तसेच कमकुवत घरे व गोठ्याची बांधणी करून घ्यावे जेणेकरून वादळी वाऱ्यामुळे नुकसान होणार नाही, असा सल्ला कृषि विज्ञान केंद्र कोसबाडचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांच्याकडून देण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी