मतदारांना पैसे देऊन कमळाला मतं देण्यास सांगत असताना व्हिडिओ कॅमेरात कैद
मतदारांना पैसे देऊन कमळाला मतं देण्यास सांगत असताना व्हिडिओ कॅमेरात कैद
पालघर । पालघरमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी पैसे वाटतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पैसे देऊन कमळासमोरचे बटण दाबा असे आव्हान केले जात होते.
नुकताच झालेल्या पालघर लोकसभा मतदार संघात भाजप, शिवसेना ठाकरे गट आणि बहुजन विकास आघाडीत तिरंगी लढत झाली. या निवडणुकीत विक्रमगड तालुक्यातील बालापूर गावातील एका घरात दोन इसम भाजपसाठी मतदान करा, असे सांगत प्रत्येक मतदाराला पाचशे रुपयांची नोट देत असल्याचा व्हिडीओ गुरुवारी वायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. दोन इसम मतदारयादी तपासून त्यात नाव असलेल्या प्रत्येक मतदाराला प्रत्येकी पाचशे रुपयांची नोट देत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. इतकेच नाही तर पैसे देणारा इसम कमळ चिन्ह तिसऱ्या क्रमांकावर असून त्यालाच मतदान करा, इलेक्शन द्यायला याल तेव्हा पैसे घेऊन जा.. असे सांगत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे विक्रमगडमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजपकडून पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप आता करण्यात येतोय. दरम्यान, या व्हिडीओ प्रकरणात भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही.
Comments
Post a Comment