घरफोडी, चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक, विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश

घरफोडी, चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक, विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश


विरार : विरारच्या राम मंदीर लेन, वर्तक वार्ड, डोंगरपाडा येथील निलप्रकाश बंगल्यात राहणारे सौरभ चौधरी (३५) यांच्या घरी २४ एप्रिलच्या रात्री लाखोंची चोरी झाल्याची घटना घडली होती. चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीच्या दरवाजाचे लॉक तोडून घरात प्रवेश करून बेडरूममध्ये असलेल्या कपाटातील ४७० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेल्याबाबत विरार पोलिसांनी २५ एप्रिलला तक्रारीवरुन विरार पो. ठाणे, गु.रजि.नं. १ ३२२/२०२४, भा.दं.वि.सं. कलम-३८०, ४५४, ४५७ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचे अनुषंगाने गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके तयार करून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने निरीक्षण करून त्याआधारे संशयित आरोपी निष्पन्न झाला. आरोपीचा शोध घेण्यासाठी अंदाजे १०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपीचा पाठलाग केला. आरोपीने विरार ते बोरिवली लोकल ट्रेनने, बोरिवली येथून मानपाडा पर्यंत बसने व तेथून पुढे रिक्षाने प्रवास केल्याचे दिसून आले. आरोपी शेवटी रिक्षातून उतरलेल्या ठिकाणी असलेल्या ३०० ते ४०० झोपडपट्टीत शोध घेणे अडचणीचे असतानाही पोलीस शोध घेत होते. आरोपी हा मानपाडा येथील वसंतविहार परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सदर ठिकाणी सापळा रचून शिताफीने आरोपी सोनू शेख (४३) याला ३० एप्रिल रोजी ताब्यात घेऊन अटक केले आहे. आरोपी हा सराईत घरफोडी करणारा असून मुंबई, ठाणे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये ५ गुन्हे दाखल आहेत. आरोपीकडून पोलिसांनी चोरी केलेल्यापैकी २७ लाख ६५ हजार रुपये किंमतीचे ३९५ ग्रॅम सोने हस्तगत केले आहे.


सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त जयंत भजबळे, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, यांचे मार्गदर्शनाखाली विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुशिलकुमार शिंदे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश हाटखिळे, पोलीस हवालदार सचिन लोखंडे, संदिप जाधव, संदिप शेरमाळे, इंद्रनिल पाटील, विशाल लोहार, संदीप शेळके, मोहसीन दिवाण, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, रोशन पुरकर, दत्तात्रय जाधव, प्रफुल सोनार यांनी केलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी