बोईसर मध्ये आचारसंहितेत आनंदी नगर येथे जोरदार दारू व मटन पार्टी
बोईसर मध्ये आचारसंहितेत आनंदी नगर येथे जोरदार दारू व मटन पार्टी
बोईसर | महाराष्ट्रसह पालघर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा सुरू असताना काही राजकीय पक्षाच्या लोकांनी आचारसंहितेचा तीन तेरा वाजवून ठेवलेला आहे.
प्रशासनानी कडेकोट बंदोबस्त ठेवून सुध्दा मतदारांना प्रलोभने दाखवण्याचे काम विविध पक्षाकडून सुरू असून अत्यंत प्रतिष्ठेचा मतदार संघ असलेला पालघर लोकसभा मतदार संघात दारू मटन पार्टी जोरात सुरू आहे.
निवडणूकीचा पार्श्वभूमी पाहता शनिवार दिनांक १८ मे रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ते २० मे रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मद्य विक्रीसाठी बंदी तसेच जमावबंदी कायदा लागू असताना बोईसर येथील सरावली ग्रामपंचायत हद्दीतील आनंदी नगर येथे जोरदार दारू व मटन पार्टी सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.
सदर पार्टी महायुतीच्या उमेदवारांकडून देण्यात आल्याचे बोललं जात असून शेखडो मतदार या ठिकाणी पार्टीचा आस्वाद घेताना दिसून आले तर तळीरामानी थेट उभ्या असलेल्या इको चार चाकी गाडीत धमाल पार्टीची मज्जा घेतली.
दरम्यान या पार्टीत महायुतीच्या कार्यकर्ता सोबत बहुजन विकास आघाडीचे काही कार्यकर्ते देखील या पार्टीचा आस्वाद घेता असल्याचे दिसून आले आहे. मद्य विक्रीसाठी संपूर्ण बंदी असताना या पार्टीसाठी मद्य पुरवठा कुठून केला जातोय ? राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे का ,? तर एक आदर्श आचारसंहिता लागू असताना निवडणूक आयोग नेमका करतोय काय ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Comments
Post a Comment