विक्रमगड येथे भरधाव ट्रक ची सहा वाहनांना जोरदार धडक : दोघांचा जागीच मृत्यू
पालघर : विक्रमगड तालुक्यातील पाली- वाडा मार्गावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रक ने सहा वाहनांना जोरदार धडक दिली असून या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.
विक्रमगड येथील पाली- वाडा मार्गावरील आलोंडे नाका येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात भरधाव ट्रक ने दोन बाईक, बस आणि कार अश्या सहा वाहनांना जोरात धडक दिली. यात एक पुरूष व एक महिला अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या अपघातामध्ये सहाही वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघाता नंतर भरधाव ट्रक रस्त्यावर पलटी झाल्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली.
Comments
Post a Comment