पालघर येथे रेल्वे ट्रॅकवरुन मालगाडीचे डब्बे घसरले
पालघर येथे रेल्वे ट्रॅकवरुन मालगाडीचे डब्बे घसरले
पालघर : पालघर येथे गुजरात कडून मुंबईला येणारी मालगाडीचे डबे पालघर रेल्वे स्थानका जवळ घसरले. मालगाडीचे 8 डब्बे रुळावरून घसरून अपघात झाला आहे, या अपघातात कुठली जीवित हानी झाली नसून मात्र डहाणू ते मुंबई च्या दिशेने रेल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
मंगळवारी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास पालघर रेल्वेस्थानका वरून गुजरातहुन मुंबई दिशेने लोखंडी कॉईल घेऊन जात असताना मालगाडीचे 7 डब्बे रुळावरून घसरले, यावेळी सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. गुजरातच्या दिशेने जाणारी रेल वाहतूक उशिराने सुरू असून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल सेवा विस्कळीत झाली आहे. या अपघातामुळे पालघर रेल्वे स्थानकाजवळील 2 नंबर व 3 नंबर रेल्वे ट्रेक ला जबर नुकसान झाले आहे.
पालघर पोलीस प्रशासन व रेल्वे विभागाचे तांत्रिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहेत, यावेळी पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनीही घटनास्थळी उपस्थिती दर्शविली. रुळावरून घसरलेल्या मालगाडीचे डब्बे पाहण्यासाठी रेल्वे प्रवासी वर्गासह शहरातील नागरिकांची मोठी गर्दी जमली होती, ज्याला नियंत्रणात आणण्यासाठी रेल्वे पोलिसाला मेहनत घ्यावी लागली. पालघर रेलवे स्थानकात मालगाडीचे सात ते आठ डबे घसरल्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे मेल व एक्सप्रेस गाड्या विविध स्थानकात थांबून ठेवण्यात आल्या आहेत. तसेच विरार पर्यंतच्या प्रवाश्यांसाठी एसटी महामंडळाने बससेवा सुरू केली आहे, रेल्वे ट्रॅक दुरुस्तीसाठी साधारण 12 तास लागण्याची शक्यता रेल्वे सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे.
Comments
Post a Comment