तात्कालीन तहसीलदार सुनील शिंदे यांच्या नोटिसी नंतर ही अभय जाधव यांच्या डांबर प्लांटवर कारवाई का नाही.....
तात्कालीन तहसीलदार सुनील शिंदे यांच्या नोटिसी नंतर ही अभय जाधव यांच्या डांबर प्लांटवर कारवाई का नाही.....
मनोर : पालघर तालुक्यातील वाडा-खडकोना येथील निसर्गरम्य स्थळावरील शेतशिवारात खाजगी डांबराचा प्लांट उभारण्यात आलेला आहे. हा प्लांट आदिवासी खातेदार अंजू चिंबाटे यांना कसून खाण्यासाठी म.ज.म अधिनियम १९६६ कलम ३६/३६ ला अधिनराहून (१) अशा एक एकर भूखंड वाटप केलेला असून या भूखंडावर अभय जाधव यांनी आपला डांबर प्लांट थाटल्याचे उघडकीस आले आहे.
सदर हॉट मिक्स डांबर प्लांट शेतीच्या परिसरात असल्याने या प्लांटमधून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित धुरामुळे परिसरातील शंभर ते दीडशे एकरातील भात शेती यासह पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे त्यामुळे शेती पुरक क्षेत्राचे राखरांगोळी होत आहे. डांबर प्लांटमधून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित धुरामुळे पिकांची वाढ खुंटली असून, पिके करपून जात आहेत. तसेच शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांनादेखील विविध त्वचारोग उद्भवू शकते. अत्यंत दूषित व दुर्गंधित वासामुळे शेतामध्ये काम करणे त्रासदायक झाले आहे. शेतकऱ्यांना शेतीशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नसल्याने शेतकरी जीव मुठीत धरून काम करीत आहेत. त्याचबरोबर हॉट मिक्स डांबर प्लांट मधून निघणारी राख लगत असलेल्या नैसर्गिक विंधन विहिरीत पडत असल्यामुळे विहीर बाधीत होत असून बोरींग खोदून देण्यात आले परंतु त्याचा वीज बिलाचा अतिरिक्त खर्च ग्रामपंचायतीच्या माथी पडत असल्यामुळे ग्रामपंचायत तिजोरी खिळ लागण्याच्या मार्गावर असताना ग्रामसेवक दिनेश पुरोहित यांच्या कार्यपद्धतीवर शंका निर्माण होत आहे तर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून कसेंट घेण्यात आली आहे का असेल तर कसेंट देताना प्रदूषण नियंत्रणात आणणारे अधिकारी डोळे बंद करून होते का? त्यामुळे परिसर प्रदूषित होत असल्यामुळे डाबर प्लांट पूर्णपणे बंद करावा, अशी मागणी वारंवार केली जात आहे.
आदिवासी खातेदार अंजू चिंबाटे व प्लांट मालक अभय जाधव यांना दिनांक ८ मार्च २०२३ रोजी तात्कालीन तहसीलदार सुनील शिंदे यांनी नोटीस बजावली होती मात्र, याबाबत कुठलीच कारवाई प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे. तर या बेकायदेशीर बांधकामाची चौकशी पालघर तहसीलदारांकडून सुरू असून तात्कालीन तहसीलदार सुनील शिंदे यांनी नोटीस बजावून देखील कारवाई करण्यात आलेली नसताना या बेकायदेशीर कृत्याला पाठबळ नेमका देतोय कोण ? तात्कालीन तहसीलदार सुनील शिंदे यांनी खातेदार अंजू चिंबाटे व प्लांट मालक अभय जाधव यांना नोटीस बजावताना वेळगाव तलाठी सजा यांच्याकडून अहवाल सादर केल्यानंतर देखील कारवाई शून्य असल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
Comments
Post a Comment