पालघर मतदार संघात उद्या मतदान! दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला...

पालघर मतदार संघात उद्या मतदान! दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला....


पालघर : लोकसभा निवडणूकीच्या अंतिम टप्प्यातील मतदान उद्या पार पडणार असून अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, मतदान केंद्रांमध्ये आजपासूनच निवडणूकीची तयारी सुरु झाली आहे. सर्व मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन पाठवण्यात आल्या आहेत.

 देशातील पाचव्या आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील लोकसभेसाठीच मतदान उद्या पार पडणार असून यात पालघर मतदार संघाचाही समावेश आहे त्यासाठी पालघर जिल्हा प्रशासन सज्ज झाला आहे  दरम्यान, या पार्श्वभूमीवर पालघर मतदारसंघांमध्ये जय्यत तयारी सुरु आहे.


पालघर मतदारसंघांमध्ये महायूती, महाविकास आघाडी व बहुजन विकास आघाडी अशी तिरंगी लढत होणार आहे. शनिवारी सायंकाळी अंतिम टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आणि आजपासून निवडणूकीची तयारी सुरु झाली आहे. दरम्यान, सोमवारी या सर्व मतदारसंघातील मतदारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.


जिल्हाधिकाऱ्यांकडून नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन

पाचव्या टप्प्यात पालघर मध्ये देखील मतदान होणार असून पालघर 22 या अनुसूचित जमाती मतदारसंघात 21 लाख 48 हजार 850 इतके मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत .  यामध्ये 11 लाख 25 हजार 209 पुरुष मतदार 10 लाख 23 हजार 80 स्त्री मतदार तर 225 तृतीयपंथी मतदार असून यासाठी जिल्ह्यात एकूण 2270 मतदान केंद्र असणार आहेत . ही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी 13921 कर्मचारी आणि अधिकारी मतदान केंद्रांवर तैनात असतील .  20 तारखेला सकाळी सात वाजता पासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे .  या मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांनी केले आहे .

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी