भीमनगर येथे भूमिहीन लोकांना सरकारकडून वाटप केलेल्या जागेवर परप्रांतीयांचे बेकायदेशीर बांधकाम
भीमनगर येथे भूमिहीन लोकांना सरकारकडून वाटप केलेल्या जागेवर परप्रांतीयांचे बेकायदेशीर बांधकाम
बोईसर : बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील भीमनगर या ठिकाणी काही भूमीहीन लोकांना सरकारकडून जमीनी वाटप करण्यात आलेल्या असून रोड लगत असलेल्या या जमीनी परप्रांतीय लोकांनी घशात घातलेल्या आहेत त्या ठिकाणी फर्निचर विक्री, घरगुती साहित्यांची विक्री अशा प्रकारे वाणिज्य वापर करणारे गाळे तयार करत ३६-३६ ला वाटप केलेल्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सर्वत्र लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला असताना महत्वाची जबाबदारी पार पाडणारे महसूल अधिकारी या निवडणुकीच्या कामात व्यस्त असताना भू माफिया बांधकाम करण्यात मस्त झाले आहेत. सरकारी जमीन असो किंवा भूमीहीन लोकांना वाटप केलेली जमीन या जमिनीवर मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू असून सरकारी कामात नेहमीच व्यस्त असणारे तलाठी या बेकायदेशीर कृत्यांना पाठबळ देत आहेत का ?
तलाठी निवडणुकीत व्यस्त असल्यामुळे कार्यालयात उपलब्ध नसून दुरध्वनी केल्यानंतर देखील बोलण्याकरता वेळ नाही तर तलाठी मॅडम यांचा कोतवाल बांधकाम ठिकाणी जाऊन कुठला निरोप तलाठी पर्यंत पोहचवत आहे हा एक संशोधनाचा विषय ठरला आहे.
Comments
Post a Comment