Posts

Showing posts from April, 2023

बोईसर तारापुर औद्योगिक क्षेत्रात केमिकल युक्त पाण्याचे तलाव

Image
बोईसर तारापुर औद्योगिक क्षेत्रात केमिकल युक्त पाण्याचे तलाव बोईसर : तारापुर औद्योगिक क्षेत्रातील आय.व्ही.पी लिमिटेड प्लॉट नं. डी- 19 कंपनी च्या मागच्या बाजूस भिंतीच्या जवळ खड्डा बनवून त्यात केमिकल युक्त पाण्या मुळे तलाव निर्माण झाला असुन अजूनही केमिकल युक्त पाणी भिंतीला लागुन वाहत असुन बाजूला ही दूसरा तलाव तयार होताना दिसत आहे. बोईसर तारापुर औद्योगिक क्षेत्राच्या आजूबाजूला गाव आहेत परंतु आजपर्यंत या गावातील लोकांनी गावात शुद्ध पाण्याचे तलाव, विहीर बघितले होते परंतु आता औद्योगिक क्षेत्रामुळे केमिकल युक्त पाण्याचेही तलाव बघायला मिळत आहे. तारापुर औद्योगिक क्षेत्रातील उद्योगानी जमीनीत केमिकल युक्त पाणी प्रक्रिया न करता सोडून भुप्रदुषण केले नंतर उत्पादन घेताना गैस सोडून वायु प्रदूषण केले आणि आता नैसर्गीक नाल्यात व अश्या प्रकारे खड्डे खोडून काही कंपण्या व केमिकल माफिया केमिकल सोडून जलप्रदुषण करत आहे अश्या वाढत्या प्रदुषणा मुळे परिसरातील नागरिकांना वेगवेगळ्या आजाराने बाधित झाले आहेत. याच कारण अश्या कंपण्यावर व केमिकल माफियानवर कडक कारवाई होत नसल्यामुळे कंपण्याचे व केमिकल माफियांचे मनोबल वाढता...

साई सावली भजन मंडळ पाम च्या वतीने वृद्धाश्रमात केले धान्य वाटप

Image
साई सावली भजन मंडळ पाम च्या वतीने वृद्धाश्रमात केले धान्य वाटप बोईसर : आज दिनांक २७/०४/२०२३ या रोजी साई सावली भजन मंडळ पाम च्या वतीने बाबा भास्कर पवार (विरार) यांच्या वृद्धाश्रमात धान्य वाटप करण्यात आले.  समाजातील लोकांचे कल्याण करणे, लोकांना मुलभुत आणि जटील गरजा पूर्ण करणे आणि लोकांना एक चांगले जीवन जगण्यास मदत करणे याच उद्देश्याने नेहमीच काही लोक किंवा संघटना समाजात वेगवेगळ्या प्रकारे समाजसेवा करत असतात अशीच समाजसेवा साईं सावली भजन मंडळ, पाम च्या वतीने भास्कर पवार (विरार) यांच्या वृद्धाश्रमात धान्य वाटप करण्यात आली तर काही दिवसापूर्वी साई सावली भजन मंडळ पाम च्या वतीने गुडीपाडवा  निमित्त पाम ते शिर्डी पदयात्रा काढण्यात आली नंतर हनुमान जयंती निमित्त भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते आणि आता समाज सेवेच्या उद्देश्याने वृद्धाश्रमात धान्य वाटप करण्यात आले. यावेळी सदर कार्यक्रमात साई सावली भजन मंडळ पाम चे अध्यक्ष श्री. सजिद मनोहर पिंपळे, खजिनदार श्री.अक्षय दीपक संखे, ग्राम पंचायत पाम माजी सदस्य श्री.अमित मनोहर संखे व साई सावली भजन मंडळ पाम चे सदस्य श्री.विलास द. पिंपळे, कल्पेश स. स...

पालघर लोहमार्ग पोलिसांना घर फोडीतील सराईत गुन्हेगाराला पकड़ण्यात आले यश

Image
पालघर लोहमार्ग पोलिसांना घर फोडीतील सराईत गुन्हेगाराला पकड़ण्यात आले यश  पालघर : पालघर रेल्वे स्टेशन पश्चिमेकडे पार्सल कार्यालय जवळ  श्रीमती तारामती कैलास यादव वय (वर्ष ६०) ह्या रेल्वे कोटर्स नंबर ११२/A, जवळ राहत असून त्या दिनांक २३ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता घर बंद करून गेल्याने ते दिनांक २५ एप्रिल रोजी पर्यंत डहाणू येथे त्यांच्या मुली कडे असतांना, घर बंद असल्याचे साधत एका चोरट्याने घर साफ करत २२,९२० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि इतर सामान वर डल्ला मारत पसार झाल्याची तक्रार तारामती यादव यांनी लोहमार्ग पोलीस ठाणे पालघर येथे दिली होती त्यानुसार संशयित आरोपी विरोधात पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्यात भादवि  ३८०,४५४ कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   त्याअनुषंगाने डी बी पथकातील अंमलदार यांनी पालघर शहरात गस्त वाढवत, गुप्त बातमीदार यांच्या मदतीने पालघर येथील सराईत आरोपी रोहित कान्हा वाघरी याला ताब्यात घेत सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, सोन्याचे दागिने आणि इतर सामान एकूण २२,९२० रुपयांचा मुद्देमाल आरोपीकडून  हस्तगत करण्यात आला आहे. या सराई...

गुटखा माफियान वर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Image
गुटखा माफियान वर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई  बोईसर : बोईसर भैयापाडा येथील पांडे डेअरी जवळ दिनांक 20/04/2023 रोजी रात्री 10 वाजता स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार गुटख्याने भरलेली छोटा हाती गाडी पकडण्यात आली असून एकूण 8 लाख 11 हजार 600 रूपये चा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात गुटखा प्रतिबंधित असताना ही बेकायदा पद्धतीने आणून बोईसर शहरात विकण्याच काम चालु असून अशीच माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच बोईसर भैयापाडा येथे पांडे डेअरी जवळ उभी असलेली छोटा हाथी गाडी (गाडी नं. MH.04. EB.1764) ही तपासणी केली असता त्यात 18 खाकी गोणी ज्यात गुटखा भरलेला असुन त्याची किंमत 5 लाख 61 हजार 600 रूपये व छोटा हाथी गाडी ज्याची किंमत 2 लाख 50 हजार असा एकूण 8 लाख 11 हजार 600 रूपये मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन अजुन पर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास सुरु आहे.

बोईसर शहरात पहिल्यांदाच 'बोईसर महोत्सव' होणार साजरा

Image
बोईसर शहरात पहिल्यांदाच 'बोईसर महोत्सव' होणार साजरा  सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येण्यासाठी बोईसर महोत्सवाचे आयोजन - प्रशांत संखे  बोईसर : काही दिवसा पासून चर्चेचा विषय ठरलेला बोईसर मध्ये एक वेगळा कार्यक्रम' बोईसर महोत्सव 'या कार्यक्रमाबाबत टिमा हॉल येथे प्रशांत संखे यांनी पत्रकार परिषद घेण्यात आली.सदर कार्यक्रमात अशोक वडे, चंदन सिंह, सुरेन्द्र राठोड, मनोज मिश्रा, राहुल पिंपळे उपस्थित होते. प्रशांत संखे यांच्या संकल्पनेतुन बोईसर शहरात पहिल्यादाच 'बोईसर महोत्सव 'उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.  बोईसर शहरात नेहमीच वेगवेगळे कार्यक्रम पाहायला मिळतात परंतु प्रथमच बोईसर महोत्सवाच आयोजन प्रशांत संखे यांनी केला आहे. बोईसर मध्ये एम.आय.डी.सी असल्यामुळे सर्व जाती धर्माचे लोक येथे राहतात त्याच बरोबर आजपर्यंत कुठलाही वाद झालेला नाही त्यामुळे येथे चांगली परिस्थिति असुन सर्व लोकांना एकत्र करण्यासाठी बोईसर महोत्सव आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम हा 22 व 23 एप्रिल असा दोन दिवशी संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजे पर्यत सर्कस ग्राउंड, हार्मोनी सोसायटी च्या बाजूला संपन्न होणार आ...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोईज शेख यांनी महाराष्ट्रात येण्यासाठी राहुल गांधी यांना लिहिले पत्र

Image
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोईज शेख यांनी महाराष्ट्रात येण्यासाठी राहुल गांधी यांना लिहिले पत्र  पालघर : महाराष्ट्र राज्यात काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी आणि महाविकास आघाडीला धार देण्यासाठी पालघर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोईज शेख यांनी राहुल गांधी यांना महाराष्ट्रात येण्याचे पत्र लिहिले आहे. राहुल गांधी यांनी लवकरात लवकर महाराष्ट्रात यावे आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि इतर मित्रपक्षांच्या नेत्यांची, विशेषत: उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांची भेट घ्यावी, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोईसे शेख यांनी पत्रात लिहिले आहे. काँग्रेस पक्ष, कामगारांसमोर येऊन त्यांना प्रोत्साहन द्या. जेणेकरुन महाराष्ट्रातील आगामी निवडणुकीत विशेषत: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला तसेच महाविकास आघाडीला दणदणीत विजय मिळू शकेल. तसेच पत्रात काँग्रेस नेते मोईज शेख यांनी लिहिले आहे की, काँग्रेस पक्षाकडून नेहमीच उशीराने निर्णय घेतला जातो, त्याचे परिणाम निवडणुकीच्या वेळी भोगावे लागतात. त्यामुळे लवकरात लवकर महाराष्ट्र राज्याचा दौरा करण्याचा निर्णय घेऊन महाराष्ट्राच्...

विश्वास फाउंडेशन च्या वतीने बोईसर येथे इफ्तार पार्टी चे आयोजन

Image
विश्वास फाउंडेशन च्या वतीने बोईसर येथे इफ्तार पार्टी चे आयोजन  बोईसर :दिनांक 15/4/2023 रोजी बोईसर येथे विश्वास फाउंडेशन तर्फे जामा मस्जिद येथे इफ्तार पार्टीत सन्माननीय रविंद्र फाटक ह्यांच्या उपस्थितीत व डॉ.विश्वास वळवी ह्यांच्या अध्यक्षे ते खाली भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले होते. मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून मुस्लिम बांधव रोजा साजरा करत आहेत.या महिन्यात मुस्लिम समाज बांधव इतर समाजातील लोकांना इफ्तार पार्टीसाठी निमंत्रण देत असुन यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्य भावना वाढते. यावेळी पवित्र रमजान महीन्यात विश्वास फाउंडेशन च्या वतीने आयोजित इफ्तार पार्टी मध्ये सन्माननीय रविंद्र फाटक व विश्वास फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष - डॉ. विश्वास वळवी यांनी मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान च्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सदर कार्यक्रमात विश्वास फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष - डॉ , विश्वास वळवी , शिवसेना आमदार तथा संपर्क प्रमुख - रविंद्र फाटक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा बोईसरचे उपसरपंच नीलम संखे , शिवसेना शहर प्रमुख मुकेश पाटिल , शिवशक्ती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटिल, जि प सदस्य महेंद...

केमिकलयुक्त रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच सोडलं समुद्रात

Image
केमिकलयुक्त रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच सोडलं समुद्रात बोईसर : तारापूर एमआयडीसीत साडेबाराशे पेक्षाही अधिक लहान मोठे कारखाने आहेत. यामध्ये केमिकल तयार करणाऱ्या कंपन्या, फार्मासिटिकल कंपन्या, गारमेंट कंपन्या,वेगवेगळ्या कलर कंपन्या तसेच सर्व क्षेत्रातील कंपन्या स्थित आहेत. त्यामुळे येथील कंपन्यांमधून निघणारं रासायनिक सांडपाणी सीईटीपीमार्फत प्रक्रिया करुन पुढे  समुद्रात सोडलं जातं. मात्र सध्या या कंपन्यांकडून हे केमिकलयुक्त रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच समुद्रात सोडलं जात असल्याचे वारंवार प्रकार उघडकीस येत आहेत. या सगळ्या प्रकारामुळे परिसरातील प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे.त्यामुळे या कंपन्यांमधून निघणारं केमिकलयुक्त रासायनिक घातक सांडपाणी खुलेआम समुद्रात सोडण्याचा प्रकार पुन्हा एकदा उघड झाला आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखाने राजरोसपणे अशा पद्धतीने आपलं केमिकलयुक्त घातक रासायनिक सांडपाणी खुल्या समुद्रात तसंच नैसर्गिक नाल्यांमध्ये सोडले जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. मात्र या प्रकारामुळे परिसरातील पर...

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या पालघर जिल्हाध्यक्षपदी श्री प्रविण संखे यांची नियुक्ती !

Image
  निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या पालघर जिल्हाध्यक्षपदी श्री प्रविण संखे  यांची नियुक्ती ! पालघर : बोईसर शहरामध्ये अनेक विकास कामे राबवून बोईसर शहराचा कायापालट करणारे बोईसरचे माजी उपसरपंच व तारापूर लेबर युनियनचे अध्यक्ष श्री प्रविण संखे यांची नियुक्ती निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ( महाराष्ट्र )या सामाजिक संस्थेच्या पालघर जिल्हा अध्यक्षपदी करण्यात आली. मंडळाचे राज्याचे अध्यक्ष श्री प्रमोद मोरे यांनी श्री प्रविण संखे यांची नियुक्ती 2023 ते 2026 या तीन वर्षाच्या कालावधीसाठी विशेष नियुक्तीपत्रद्वारे 22 मार्च 2023 रोजी अहमदनगर येथे केली आहे. सदर  मंडळातील पालघर जिल्हाध्यक्ष म्हणून झालेल्या नवनियुक्तीसाठी श्री प्रविण संखे यांचे विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातून मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.  पर्यावरणाची विशेष आवड असलेले व मागील अनेक वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान दिलेले श्री प्रविण संखे यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर आनंद व्यक्त करताना सांगितले की या जिल्ह्यातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणाचे संरक्षण व ...

तारापुर औद्योगिक क्षेत्र बनतोय प्रदुषणाचा अड्डा

Image
तारापुर औद्योगिक क्षेत्र बनतोय प्रदुषणाचा अड्डा  बोईसर : तारापुर औद्योगिक क्षेत्रातील वाढते प्रदुषणा बाबत वारंवार तक्रार देऊन ही कोणतीही कारवाई होत नसल्या मुळे आता एम.आय.डी. सी लगत असलेल्या ग्रामपंचायतीने प्रदुषणा बाबत आवाज उठवला आहे.यासाठीच काही दिवसा पूर्वी पाम, कुंभवली, कोलवडे या तिन्ही ग्रामपंचायतने प्रदुषण बाबत रस्त्यावर उतरुन नैसर्गीक नाले बंद केले होते परंतु एवढे करुन ही काही कंपन्या ना यांचा काही मात्र फरक पडलेला दिसत नाही तारापुर औद्योगिक क्षेत्रातील नामांकित वसुंधरा डेअरी आईस्क्रीम कंपनीकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना असलेल्या सुट्टीच्या दिवशी दिवसाढवळ्या ट्रक्टर टॅंकर द्वारे घातक घनकचरा बोईसर परिसरात उघड्यावर विल्हेवाट लावून  पर्यावरण नियमांचे उल्लंघन  केले जात आहे तसेच सदर ट्रक्टर टॅंकरचा आरटीओ विभागाकडून मंजुरी न मिळालेला ट्रक्टर टॅंकरचा दिवसाढवळ्या वापर केला जात आहे तसेच विशेष म्हणजे हे काम एका राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून केला जात असल्यामुळे नेत्याच्या या घाणेरड्या प्रवृत्तीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सर्व जनतेच्या आरोग्या...

तारापुर औद्योगिक क्षेत्रातील नैसर्गिक नाले 15 दिवसात होणार बंद

Image
तारापुर औद्योगिक क्षेत्रातील नैसर्गिक नाले 15 दिवसात होणार बंद काही कंपन्याना आम्ही ब्लैकलिस्ट केलेले आहे - डी.के.राउत बोईसर : नैसर्गिक नाल्यात सोडण्यात येत असलेल्या केमिकल युक्त पाण्याच्या विरोधात पाम, कुंभवली, कोलवडे या तिन्ही गावांच्या ग्रामपंचायतींनी ठराव करून या पूर्वी देखील ग्रामस्थांनी संबधित अधिकाऱ्याना निवेदन देण्यात आले होते परंतु कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे आता वाढत्या प्रदुषणा बाबत या तिनही ग्रामपंचायतीने  रणशिंग फुंकले आहे. कारखान्यातून  सोडण्यात येणारे रसायनयुक्त पाण्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे काही दिवसा पूर्वी या तिन्ही ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी गावाकडे वाहून जाणारे नैसर्गीक नाल्यात मातीचे भराव टाकून बंद करण्यात आले होते. त्या संदर्भात दिनांक 06/04/2023 रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळ व औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त सभेचे आयोजन टिमा सभागृहात केले होते त्यावेळी टिमाचे पदाधिकारी व तिन्ही ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना देखील निमंत्रण देण्यात आले होते. यावेळी तिन्ही ग्रामपंचायतीच्या सरपंच...

शिरपूर पोलिसांनी नराधमाच्या बोईसरहून आवळल्या मुसक्या

Image
शिरपूर पोलिसांनी नराधमाच्या बोईसरहून आवळल्या मुसक्या बोईसरच्या नराधमाचा तरुणीवर अमानुष अन् अनैसर्गिक अत्याचार तीन वर्ष असाह्य वेदनांनी तरुणी बेजार, आईच्या मदतीने गुन्हा दाखल बोईसर: शितपेयात गुंगीचे औषध देऊन बोईसर येथील नराधम तरुणाने २१ वर्षीय तरुणीला मारहाण करीत अमानुष आणि अनैसर्गिकरित्या बलात्कारीत तिचे विवस्त्र फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याची घटना घडली. सलग तीन वर्ष त्याचा अमानुष अत्याचार असाह्य झाल्याने अखेर त्याला धडा शिकवण्यासाठी फिर्याद दिल्याने शिरपूर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.   याबाबत अधिक माहिती अशी की, बोईसर येथील भूषण वसंत करणकाळे याने २०१९ मध्ये चोपडा तालुक्यातील एका २१ वर्षीय तरुणीशी मैत्री करत तिला शिरपूर येथील हॉटेलवर नेत शीतपेयात गुंगीचे औषध देत तिच्या अंगाला स्पर्श करू लागला. तरुणीने त्याला विरोध केला असता तिला मारहाण करत तिच्यावर अत्याचार केला. आणि तिचे विवस्त्र आणि बिभित्स अवस्थेत फोटो काढत तिला वेळीवेळी ब्लॅकमेल करत तिच्या इच्छेविरुद्ध  अनैसर्गिक रित्या तिच्यावर अत्याचार करीत होता. कधी धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील हॉटेलम...

जनसंवाद अभियानातुन तारापुर पोलीस हद्दीत केले मोफत हेल्मेट वाटप

Image
जनसंवाद अभियानातुन तारापुर पोलीस हद्दीत केले मोफत हेल्मेट वाटप   बोईसर : जिल्हा पोलीस दलातर्फे जनसंवाद अभियानर्गत तारापूर पोलीसांनी परनाळी नाका येथे पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते हेल्मेट वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता   महावीर जयंती दिनी जनसंवाद अभियानांतर्गत हेल्मेट वाटप करून दुचाकी चालवत असताना हेल्मेट वापरणे किती महत्वाचे आहे या बद्दल उदाहरण देत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी बोलताना सांगितले की वर्षाकाठी महाराष्ट्रात सुमारे १४ ते १५ हजार मृत्यू अपघातात होत असून यामध्ये अधिक प्रमाण हे दुचाकी वाहन धारकांचा यात समावेश आहे. एखाद्या सर्व सामान्य कुटुंबातील कर्ता दर्ता अपघातात मृत्यूमुखी झाल्यानंतर त्याचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत असतो. तसेच 70% लोकांचा मृत्यु हा हेल्मेट न घातल्यामुळे होतो. आता पर्यंत पालघर जिल्ह्यात अजुनपर्यंत ट्रैफ़िक ब्रांच नसल्यामुळे लोकांना ट्रिपल सीट जाणे , बिना हेल्मेट जाणे, उलट्या दिशेने वाहन चालविणे परंतु मात्र आता ट्रैफिक ब्रांच आल्यामुळे यावर आळा बसताना दिसत आहे. तसेच अपघात झाल्यानंतर मृत्यु होणे अटळ आहे परंतु ह...

दहा हजाराची लाच स्वीकारताना तलाठी एसीबी च्या जाळ्यात

Image
दहा हजाराची लाच स्वीकारताना तलाठी एसीबी च्या जाळ्यात  पालघर : तलाठी,सजा अल्याळी (वर्ग 3) महेशकुमार जनार्दन कचरे वय 46 वर्ष यानी तक्रारदार यांच्या कडून लाचेची मांगणी करून स्वीकारताना एंटी करप्शन ब्यूरो पालघर विभागा कडून रंगेहाथ पकडण्यात आले आहे. महेशकुमार जनार्दन कचरे हे तलाठी असुन तक्रारदाराने खरेदी केलेल्या जमिनीचे फेरफार ची महसूल अभिलेखात नोंद करण्यासाठी तक्रारदार यांचेकडे  15,000/- हजार रुपये  लाचेची मागणी केल्याचे पडताळणी दरम्यान निष्पन्न झाल्याने आज 03/04/2023 रोजी 14.37 वा. सापळा रचला असता 10,000/- रुपये लाच स्वीकारुन  लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ची चाहूल लागताच पळुन जात असताना पाठलाग करुन महेशकुमार जनार्दन कचरे यांना रंगेहाथ पकडण्यात आले असुन त्यांचेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत असुन पुढील कारवाई चालू आहे.                                     

महालक्ष्मी यात्रेत vip पास , जुगार, मटका, दारू बंद.

Image
महालक्ष्मी यात्रेत vip पास , जुगार, मटका, दारू बंद. भाविकांच्या सोयीसुविधा व सुरक्षा बाबत घेतली आढावा बैठक डहाणु : डहाणू च्या प्रसिध्द महालक्ष्मी देवीची यात्रा 6 एप्रिल पासून सुरू होत असून यात्रेसाठी सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी आढावा बैठक घेतली होती यावेळी मंदिर गाभाऱ्यामध्ये व्हीआयपी पास प्रवेश बंद करण्यात आले आहेत. तसेच यात्रेत जुगार मटका बंद, रात्री 9 वाजे नंतर दारूची दुकाने बंद होणार असुन पाळणे व चित्त थरारक खेळ सुद्धा सुरक्षेतेच्या दृष्टीने विमा कवच खाली घेण्याची नागरिकांनी मागणी केली आहे. डहाणू तालूक्यातील प्रसिद्ध  लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान असलेल्या श्री महालक्ष्मी देवीची यात्रा 6 एप्रिल पासून सुरू होणार आहे .यात्रेत दरवर्षी जवळ पास आठ लाख संख्येने भाविक येतात, त्यामुळे भाविकांच्या सोयीसुविधा सुरक्षा संदर्भात मंदिर ट्रस्ट कार्यालयात  सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांत अधिकारी डहाणू  संजिता महापात्र यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांच्या अधिकारी वर्ग, ट्रस्ट तसेच ग्रामस्थ,पत्रकार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक आयोजित केली होती.        सलग १५ दिवस चा...

तारापुर औद्योगिक क्षेत्रातील नैसर्गीक नाले ग्रामपंचायतीने केले बंद

Image
तारापुर औद्योगिक क्षेत्रातील नैसर्गीक नाले ग्रामपंचायतीने केले बंद  प्रदुषणा बाबत पाम, कुंभवली, कोलवडे ग्रामपंचायत आक्रमक  बोईसर : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत आणि मोठी मानली जाणारी तारापूर औद्योगिक वसाहत आता प्रदुषणाच्या बाबतीत देखील उच्च स्थानावर झळखत आहे. या वाढत्या प्रदुषणाचा धोका परिसारातील लोकांच्या जीवितास निर्माण झालेला असुन प्रशासन यावर ठोस उपाययोजना करत नसल्यामुळे आज  परिसरातील जनतेच्या मनात भयंकर संतापाची लाट पसरली आहे. आज कित्येक वर्षापासून एम. आय. डी. सीत प्रदुषण विभाग, उप अभियंता बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग, असे प्रत्येक सरकारी कार्यालय असुन यातील अधिकारी ह्या प्रदुषणा कडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत  त्यामुळे आता प्रदुषणा बाबतीत पाम, कुंभवली, कोलवडे या ग्रामपंचायतीने स्वःत पुढाकार घेतला आहे. एम.आय.डी.सी तील उद्योजक केमिकल माफियांना हाताशी धरून नैसर्गीक नाल्यात बारमाही हजारों लीटर रासायनिक पाणी सोडण्यात येते त्यामुळे येथील सुपीक शेती नापीक झाली आहे. त्यावर कोणतीही लागवड करू शकत नाही व केमिकल युक्त पाण्यामुळे गावाची परिस्थिति भयानक झ...