बोईसर तारापुर औद्योगिक क्षेत्रात केमिकल युक्त पाण्याचे तलाव
बोईसर तारापुर औद्योगिक क्षेत्रात केमिकल युक्त पाण्याचे तलाव
बोईसर : तारापुर औद्योगिक क्षेत्रातील आय.व्ही.पी लिमिटेड प्लॉट नं. डी- 19 कंपनी च्या मागच्या बाजूस भिंतीच्या जवळ खड्डा बनवून त्यात केमिकल युक्त पाण्या मुळे तलाव निर्माण झाला असुन अजूनही केमिकल युक्त पाणी भिंतीला लागुन वाहत असुन बाजूला ही दूसरा तलाव तयार होताना दिसत आहे.
बोईसर तारापुर औद्योगिक क्षेत्राच्या आजूबाजूला गाव आहेत परंतु आजपर्यंत या गावातील लोकांनी गावात शुद्ध पाण्याचे तलाव, विहीर बघितले होते परंतु आता औद्योगिक क्षेत्रामुळे केमिकल युक्त पाण्याचेही तलाव बघायला मिळत आहे. तारापुर औद्योगिक क्षेत्रातील उद्योगानी जमीनीत केमिकल युक्त पाणी प्रक्रिया न करता सोडून भुप्रदुषण केले नंतर उत्पादन घेताना गैस सोडून वायु प्रदूषण केले आणि आता नैसर्गीक नाल्यात व अश्या प्रकारे खड्डे खोडून काही कंपण्या व केमिकल माफिया केमिकल सोडून जलप्रदुषण करत आहे अश्या वाढत्या प्रदुषणा मुळे परिसरातील नागरिकांना वेगवेगळ्या आजाराने बाधित झाले आहेत. याच कारण अश्या कंपण्यावर व केमिकल माफियानवर कडक कारवाई होत नसल्यामुळे कंपण्याचे व केमिकल माफियांचे मनोबल वाढताना दिसुन येत आहे तसेच आता पर्यत केमिकल युक्त पाणी नैसर्गीक नाल्यातून वाहुन गावात जात होते परंतु आता कंपण्या केमिकल माफियाना हाताशी धरुन औद्योगिक क्षेत्राजवळील शेतात दिवसरात्र सोडताना दिसून येत आहे.
अश्याच तारापुर औद्योगिक क्षेत्रातील RESONANCE SPECIALITIES LTD प्लॉट क्रमांक T-140 या कंपनीलाही शेतात केमिकल युक्त पाणी सोडताना दोन वेळा पकड़ण्यात आले होते व तसा अहवाल ही वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात आला होता परंतु अजुन पर्यत कोणतीही कठोर कारवाई झालेली नसल्यामुळे व दिनांक 21/04/2023 रोजी प्लॉट नं. जे.10 रोड लगत केमिकल टैंकर गळती प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता व आता केमिकल माफियानी खड्डा खोडून त्यात केमिकल टाकण्याच काम चालु केले आहे तर अश्या प्रदूषण पसरवण्याऱ्या कंपण्यावर व केमिकल माफियानवर संबधित विभागाकडून कठोर कारवाई कधी होणार की असच सुरु राहणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
Comments
Post a Comment