तारापुर औद्योगिक क्षेत्र बनतोय प्रदुषणाचा अड्डा
तारापुर औद्योगिक क्षेत्र बनतोय प्रदुषणाचा अड्डा
बोईसर : तारापुर औद्योगिक क्षेत्रातील वाढते प्रदुषणा बाबत वारंवार तक्रार देऊन ही कोणतीही कारवाई होत नसल्या मुळे आता एम.आय.डी. सी लगत असलेल्या ग्रामपंचायतीने प्रदुषणा बाबत आवाज उठवला आहे.यासाठीच काही दिवसा पूर्वी पाम, कुंभवली, कोलवडे या तिन्ही ग्रामपंचायतने प्रदुषण बाबत रस्त्यावर उतरुन नैसर्गीक नाले बंद केले होते परंतु एवढे करुन ही काही कंपन्या ना यांचा काही मात्र फरक पडलेला दिसत नाही
तारापुर औद्योगिक क्षेत्रातील नामांकित वसुंधरा डेअरी आईस्क्रीम कंपनीकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना असलेल्या सुट्टीच्या दिवशी दिवसाढवळ्या ट्रक्टर टॅंकर द्वारे घातक घनकचरा बोईसर परिसरात उघड्यावर विल्हेवाट लावून पर्यावरण नियमांचे उल्लंघन केले जात आहे तसेच सदर ट्रक्टर टॅंकरचा आरटीओ विभागाकडून मंजुरी न मिळालेला ट्रक्टर टॅंकरचा दिवसाढवळ्या वापर केला जात आहे तसेच विशेष म्हणजे हे काम एका राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून केला जात असल्यामुळे नेत्याच्या या घाणेरड्या प्रवृत्तीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सर्व जनतेच्या आरोग्याची खेळ खेळण्याऱ्या या कंपनीवर प्रदूषण नियंत्रण मंडळ नेमकी कुठली कारवाई करणार ? नाहीतर नेहमीप्रमाणे सुवर्ण मध्य काढत थातूरमातूर कारवाई करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे
Comments
Post a Comment