जनसंवाद अभियानातुन तारापुर पोलीस हद्दीत केले मोफत हेल्मेट वाटप
जनसंवाद अभियानातुन तारापुर पोलीस हद्दीत केले मोफत हेल्मेट वाटप
बोईसर : जिल्हा पोलीस दलातर्फे जनसंवाद अभियानर्गत तारापूर पोलीसांनी परनाळी नाका येथे पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते हेल्मेट वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
महावीर जयंती दिनी जनसंवाद अभियानांतर्गत हेल्मेट वाटप करून दुचाकी चालवत असताना हेल्मेट वापरणे किती महत्वाचे आहे या बद्दल उदाहरण देत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी बोलताना सांगितले की वर्षाकाठी महाराष्ट्रात सुमारे १४ ते १५ हजार मृत्यू अपघातात होत असून यामध्ये अधिक प्रमाण हे दुचाकी वाहन धारकांचा यात समावेश आहे. एखाद्या सर्व सामान्य कुटुंबातील कर्ता दर्ता अपघातात मृत्यूमुखी झाल्यानंतर त्याचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत असतो. तसेच 70% लोकांचा मृत्यु हा हेल्मेट न घातल्यामुळे होतो. आता पर्यंत पालघर जिल्ह्यात अजुनपर्यंत ट्रैफ़िक ब्रांच नसल्यामुळे लोकांना ट्रिपल सीट जाणे , बिना हेल्मेट जाणे, उलट्या दिशेने वाहन चालविणे परंतु मात्र आता ट्रैफिक ब्रांच आल्यामुळे यावर आळा बसताना दिसत आहे. तसेच अपघात झाल्यानंतर मृत्यु होणे अटळ आहे परंतु हेल्मेट घातल्यावर अपघातात ट्रक खाली आलेल्या चाही जीव वाचला आहे त्यामुळे हेल्मेट घालणे ही एक काळाची गरज आहे त्यामुळेच हा कार्यक्रम त्या अर्थाने फार महत्वाचा आहे.
तारापूर पोलीस ठाणे अंतर्गत बाणगंगा पुलावर पोलिसांकडून गस्त घालत असल्यामुळे मागिल वर्षांपेक्षा या वर्षी अपघातांची नोंद कमी झालेली असून जनतेकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व बोईसरचे उपविभागीय पोलिस अधिकारी नित्यानंद झा यांच्या हस्ते मुलांना, पुरुषाना तसेच महिलांना या कार्यक्रमात हेल्मेट वाटप करून दुचाकी चालवत असताना नेहमी हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले. तसेच
यवेळी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, बोईसरचे उपविभागीय पोलिस अधिकारी नित्यानंद झा, तारापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस अधिकारी योगेश जाधव, वी एम पाटील कृषी विद्यापीठाचे मिलिंद पाटील, उपस्थित पोलीस पाटील, तटरक्षक, सागरी सुरक्षा दल उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व बोईसरचे उपविभागीय पोलिस अधिकारी नित्यानंद झा यांनी हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकीस्वारांना हिरवा झेंडा दाखवून रॅली काढण्यात आली. तसेच या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संजय घरत यांनी केले.
Comments
Post a Comment