निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या पालघर जिल्हाध्यक्षपदी श्री प्रविण संखे यांची नियुक्ती !

 निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या पालघर जिल्हाध्यक्षपदी श्री प्रविण संखे  यांची नियुक्ती !

पालघर : बोईसर शहरामध्ये अनेक विकास कामे राबवून बोईसर शहराचा कायापालट करणारे बोईसरचे माजी उपसरपंच व तारापूर लेबर युनियनचे अध्यक्ष श्री प्रविण संखे यांची नियुक्ती निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ( महाराष्ट्र )या सामाजिक संस्थेच्या पालघर जिल्हा अध्यक्षपदी करण्यात आली. मंडळाचे राज्याचे अध्यक्ष श्री प्रमोद मोरे यांनी श्री प्रविण संखे यांची नियुक्ती 2023 ते 2026 या तीन वर्षाच्या कालावधीसाठी विशेष नियुक्तीपत्रद्वारे 22 मार्च 2023 रोजी अहमदनगर येथे केली आहे. सदर  मंडळातील पालघर जिल्हाध्यक्ष म्हणून झालेल्या नवनियुक्तीसाठी श्री प्रविण संखे यांचे विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातून मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.

 पर्यावरणाची विशेष आवड असलेले व मागील अनेक वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान दिलेले श्री प्रविण संखे यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर आनंद व्यक्त करताना सांगितले की या जिल्ह्यातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन राखणे काळाच्या  गरजेचे असून , वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी व प्रदूषण निवारण करण्यासाठी पर्यावरणसंबंधित विविध शासकीय योजनांचा लाभ जनतेला मिळवून देण्यासाठी मी शासन दरबारी प्रयत्न करणार आहे. औद्योगिक क्षेत्रातील वाढते प्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी पर्यावरण खात्यातील संबंधित शासकीय अधिकाऱ्याची भेट घेऊन व औद्योगिक आस्थापना संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करून जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण निवारण करण्याचा उद्देश व हेतू यशस्वीरित्या अमलात आणणार तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये वृक्षरोपण कार्यक्रम राबवून पर्यावरण संबंधी जनजागृती कार्यक्रम लवकरच सुरू करणार असल्याचे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ (महाराष्ट्र) या  संस्थेचे पालघर जिल्हाध्यक्ष श्री प्रविण संखे यांनी बोलताना सांगितले.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी