पालघर लोहमार्ग पोलिसांना घर फोडीतील सराईत गुन्हेगाराला पकड़ण्यात आले यश

पालघर लोहमार्ग पोलिसांना घर फोडीतील सराईत गुन्हेगाराला पकड़ण्यात आले यश 

पालघर : पालघर रेल्वे स्टेशन पश्चिमेकडे पार्सल कार्यालय जवळ  श्रीमती तारामती कैलास यादव वय (वर्ष ६०) ह्या रेल्वे कोटर्स नंबर ११२/A, जवळ राहत असून त्या दिनांक २३ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता घर बंद करून गेल्याने ते दिनांक २५ एप्रिल रोजी पर्यंत डहाणू येथे त्यांच्या मुली कडे असतांना, घर बंद असल्याचे साधत एका चोरट्याने घर साफ करत २२,९२० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि इतर सामान वर डल्ला मारत पसार झाल्याची तक्रार तारामती यादव यांनी लोहमार्ग पोलीस ठाणे पालघर येथे दिली होती त्यानुसार संशयित आरोपी विरोधात पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्यात भादवि  ३८०,४५४ कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

त्याअनुषंगाने डी बी पथकातील अंमलदार यांनी पालघर शहरात गस्त वाढवत, गुप्त बातमीदार यांच्या मदतीने पालघर येथील सराईत आरोपी रोहित कान्हा वाघरी याला ताब्यात घेत सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, सोन्याचे दागिने आणि इतर सामान एकूण २२,९२० रुपयांचा मुद्देमाल आरोपीकडून  हस्तगत करण्यात आला आहे. या सराईत आरोपीवर  पालघर पोलीस ठाण्यात दहाच्या वरती घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

सदर ची कामगिरी मा. पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई श्री.रवींद्र शिसवे, मा.पोलीस उपायुक्त श्री.संदीप भाजीभाकरे, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त वसई विभाग, लोहमार्ग मुंबई श्री. बाजीराव महाजन यांचे मार्गदर्शनखाली प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नरेश रणधीर, पोलीस नायक विशाल गोळे, राहुल भोईटे,पोलीस शिपाई अजय शेंडगे,अतुल कुटे, शरणबसप्पा धमदे, व दिपक डावखर यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी