शिरपूर पोलिसांनी नराधमाच्या बोईसरहून आवळल्या मुसक्या

शिरपूर पोलिसांनी नराधमाच्या बोईसरहून आवळल्या मुसक्या

बोईसरच्या नराधमाचा तरुणीवर अमानुष अन् अनैसर्गिक अत्याचार

तीन वर्ष असाह्य वेदनांनी तरुणी बेजार, आईच्या मदतीने गुन्हा दाखल

बोईसर: शितपेयात गुंगीचे औषध देऊन बोईसर येथील नराधम तरुणाने २१ वर्षीय तरुणीला मारहाण करीत अमानुष आणि अनैसर्गिकरित्या बलात्कारीत तिचे विवस्त्र फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याची घटना घडली. सलग तीन वर्ष त्याचा अमानुष अत्याचार असाह्य झाल्याने अखेर त्याला धडा शिकवण्यासाठी फिर्याद दिल्याने शिरपूर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.  

याबाबत अधिक माहिती अशी की, बोईसर येथील भूषण वसंत करणकाळे याने २०१९ मध्ये चोपडा तालुक्यातील एका २१ वर्षीय तरुणीशी मैत्री करत तिला शिरपूर येथील हॉटेलवर नेत शीतपेयात गुंगीचे औषध देत तिच्या अंगाला स्पर्श करू लागला. तरुणीने त्याला विरोध केला असता तिला मारहाण करत तिच्यावर अत्याचार केला. आणि तिचे विवस्त्र आणि बिभित्स अवस्थेत फोटो काढत तिला वेळीवेळी ब्लॅकमेल करत तिच्या इच्छेविरुद्ध  अनैसर्गिक रित्या तिच्यावर अत्याचार करीत होता.

कधी धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील हॉटेलमध्ये तर कधी मुंबई येथे बोलावत तिच्यावर अत्याचार करीत होता. तरुणीने त्याला विरोध केला तर तिला मारहाण करीत तिच्या आई आणि भावाला मारण्याची धमकी देत अत्याचार करायचा. पीडित तरुणी २०१९ पासून हा त्रास सहन करीत असल्याने अखेर हा त्रास असह्य झाला होता. तरुणीला वडील नसल्याने तिने आईला सर्व घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे तिच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. नंतर स्वतःला सावरत या नराधमाला धडा शिकवण्यासाठी तरुणीच्या आईने सरळ शिरपूर पोलीस ठाणे गाठत २७ मार्च रोजी भूषण वसंत करणकाळे वय ( वर्ष २७) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार भारतीय दंड संहिता ३७६, ३७६ (२), ३७७,३२३,५०४,५०६  कलमानुसार शिरपूर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरपूर पोलिसांनी आरोपी भूषण वसंत करणकाळे याला रविवारी बोईसर येथील यशवंत सृष्टी येथून ताब्यात घेतले आहे. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी  त्याच्यावर या अगोदर देखील बोईसर पोलीस ठाण्यात विनयभंग सारखा गंभीर गुन्हा दाखल झाला होता.  त्यावेळेस हा बोईसर येथून सहा महिने फरार झाला होता. सदर विनयभंग केल्याप्रकरणी समोरच्या महिलेवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवत विनयभंगाची तक्रार मागे घ्यायला लावत त्याच्या बाजूलाच राहत असलेल्या महिलेवर दबाव टाकत तक्रार मागे घ्यायला भाग पाडले. त्यामुळे कायद्याने त्याला ठेचून काढण्यासाठी पोलिसांनी सखोल तपास करावा, अशी पिडिताकडून मागणी  होत आहे.






Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी