महालक्ष्मी यात्रेत vip पास , जुगार, मटका, दारू बंद.

महालक्ष्मी यात्रेत vip पास , जुगार, मटका, दारू बंद.

भाविकांच्या सोयीसुविधा व सुरक्षा बाबत घेतली आढावा बैठक

डहाणु : डहाणू च्या प्रसिध्द महालक्ष्मी देवीची यात्रा 6 एप्रिल पासून सुरू होत असून यात्रेसाठी सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी आढावा बैठक घेतली होती यावेळी मंदिर गाभाऱ्यामध्ये व्हीआयपी पास प्रवेश बंद करण्यात आले आहेत. तसेच यात्रेत जुगार मटका बंद, रात्री 9 वाजे नंतर दारूची दुकाने बंद होणार असुन पाळणे व चित्त थरारक खेळ सुद्धा सुरक्षेतेच्या दृष्टीने विमा कवच खाली घेण्याची नागरिकांनी मागणी केली आहे. डहाणू तालूक्यातील प्रसिद्ध  लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान असलेल्या श्री महालक्ष्मी देवीची यात्रा 6 एप्रिल पासून सुरू होणार आहे .यात्रेत दरवर्षी जवळ पास आठ लाख संख्येने भाविक येतात, त्यामुळे भाविकांच्या सोयीसुविधा सुरक्षा संदर्भात मंदिर ट्रस्ट कार्यालयात  सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांत अधिकारी डहाणू  संजिता महापात्र यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांच्या अधिकारी वर्ग, ट्रस्ट तसेच ग्रामस्थ,पत्रकार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक आयोजित केली होती. 

      सलग १५ दिवस चालणारी ही जिल्हातील सर्वात मोठी यात्रा असून महाराष्ट्र बरोबर परराज्यातील लाखो भाविक या निमित्ताने येथे येत असतात. त्यामुळे भाविकांच्या सोयीसुविधा, कायदा व सुव्यवस्था चोख राहावी या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून यात्रा परिसरातील स्वचछतागृह, कचरा समस्या, पिण्याचे पाणी, यात्रा परिसरातील वाहतूक कोंडी, भाविकांच्या सोयीसुविधा तसेच यात्रेत दुकानाची रस्त्यावरील अतिक्रमण, गर्दी आदी  बाबतीत प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेण्यात आला. यात्रेदरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार असून चार ठिकाणी टावर टेहळणी पथके तैनात असणार आहेत. संपूर्ण परिसरावर  नियंत्रण ठेवण्यासाठी यांचा उपयोग होणार आहे तसेच विशेष निगराणी ठेवली जाणार आहेत. यात्रेत मुख्य रस्त्यांवर दुकानदारांनी केलेलें अतिक्रमणाची  पाहणी करुन अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. या साठी ट्रस्ट, प्रशासन व ग्रामस्थ, महसूल , ग्रामपंचायत  बांधकाम विभाग, पोलिस प्रशासन यांनी पाहणी केली. या बैठकीत सुरवातीला मंदिर ट्रस्ट कडून मंदिर परिसरात 45 सी सी टीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. तसेच भाविकांची मागणी व गर्दी लक्षात घेता या वर्षी देवीचे मुख दर्शनाची व्यवस्था केली जाणार आहे.तसेच सुरक्षेच्या दृष्टीने 80 सिक्युरिटी गार्ड, 20 स्वयंसेवक आणि मंदिर यात्रा  परिसरात साफसफाई साठी 45 सफाई कामगार व  घंटागाड्या यांची व्यवस्था केली जाणार आहे या वर्षी यात्रा कालावधी दर्शनासाठी साठी व्हीआयपी पास बंद ठेवण्यात आले आहे.आदी ट्रस्ट कडून केलेल्या उपाययोजना व सुविधा यांची माहिती  ट्रस्टचे कार्यवाह शशिकांत ठाकूर यांनी दिली

    यावेळी प्रांत अधिकारी यांनी ग्रामपंचायत पंचायत प्रशासनास येथील कचरा समस्या व व्यवस्थापन,प्लास्टिक वापर ,पार्किंग सुविधा तसेच दुकाने अतिक्रमणे आदी बाबतीत सूचना देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले त्याच बरोबर मोबाइल टॉयलेट, फायर ब्रिगेड, वैद्यकीय सुविधा, वीज वितरण सुविधा चा सुद्धा आढावा उपस्थित अधिकारी वर्गाकडून घेतला.

या आढावा बैठकीस सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांत अधिकारी संजिता महापात्र,उप जिल्हाधिकारी रोहन कुवर नायब तहसीलदार  एस एम चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील,  ट्रस्टचे अध्यक्ष संतोष देशमुख , चंदू सातवी , किशोर सातवी ,योगेश सातवी,सरपंच नितेश भोईर  तसेच आरोग्य, विद्युत, बांधकाम, पशुवैद्यकीय, महसूल,  आदी विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.व दुकानदार मोठया संख्येने उपस्थित होत यामध्ये उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व महामार्ग मदत कक्ष पोलीस गैरहजर होते.आढावा बैठकीला उपस्थित न राहिलेल्या विभागांना नोटीस देणार असे सांगितले.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी