दहा हजाराची लाच स्वीकारताना तलाठी एसीबी च्या जाळ्यात
दहा हजाराची लाच स्वीकारताना तलाठी एसीबी च्या जाळ्यात
पालघर : तलाठी,सजा अल्याळी (वर्ग 3) महेशकुमार जनार्दन कचरे वय 46 वर्ष यानी तक्रारदार यांच्या कडून लाचेची मांगणी करून स्वीकारताना एंटी करप्शन ब्यूरो पालघर विभागा कडून रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
महेशकुमार जनार्दन कचरे हे तलाठी असुन तक्रारदाराने खरेदी केलेल्या जमिनीचे फेरफार ची महसूल अभिलेखात नोंद करण्यासाठी तक्रारदार यांचेकडे 15,000/- हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे पडताळणी दरम्यान निष्पन्न झाल्याने आज 03/04/2023 रोजी 14.37 वा. सापळा रचला असता 10,000/- रुपये लाच स्वीकारुन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ची चाहूल लागताच पळुन जात असताना पाठलाग करुन महेशकुमार जनार्दन कचरे यांना रंगेहाथ पकडण्यात आले असुन त्यांचेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत असुन पुढील कारवाई चालू आहे.
Comments
Post a Comment