गुटखा माफियान वर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
गुटखा माफियान वर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
बोईसर : बोईसर भैयापाडा येथील पांडे डेअरी जवळ दिनांक 20/04/2023 रोजी रात्री 10 वाजता स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार गुटख्याने भरलेली छोटा हाती गाडी पकडण्यात आली असून एकूण 8 लाख 11 हजार 600 रूपये चा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रात गुटखा प्रतिबंधित असताना ही बेकायदा पद्धतीने आणून बोईसर शहरात विकण्याच काम चालु असून अशीच माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच बोईसर भैयापाडा येथे पांडे डेअरी जवळ उभी असलेली छोटा हाथी गाडी (गाडी नं. MH.04. EB.1764) ही तपासणी केली असता त्यात 18 खाकी गोणी ज्यात गुटखा भरलेला असुन त्याची किंमत 5 लाख 61 हजार 600 रूपये व छोटा हाथी गाडी ज्याची किंमत 2 लाख 50 हजार असा एकूण 8 लाख 11 हजार 600 रूपये मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन अजुन पर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास सुरु आहे.
Comments
Post a Comment