साई सावली भजन मंडळ पाम च्या वतीने वृद्धाश्रमात केले धान्य वाटप
साई सावली भजन मंडळ पाम च्या वतीने वृद्धाश्रमात केले धान्य वाटप
बोईसर : आज दिनांक २७/०४/२०२३ या रोजी साई सावली भजन मंडळ पाम च्या वतीने बाबा भास्कर पवार (विरार) यांच्या वृद्धाश्रमात धान्य वाटप करण्यात आले.
समाजातील लोकांचे कल्याण करणे, लोकांना मुलभुत आणि जटील गरजा पूर्ण करणे आणि लोकांना एक चांगले जीवन जगण्यास मदत करणे याच उद्देश्याने नेहमीच काही लोक किंवा संघटना समाजात वेगवेगळ्या प्रकारे समाजसेवा करत असतात अशीच समाजसेवा साईं सावली भजन मंडळ, पाम च्या वतीने भास्कर पवार (विरार) यांच्या वृद्धाश्रमात धान्य वाटप करण्यात आली तर काही दिवसापूर्वी साई सावली भजन मंडळ पाम च्या वतीने गुडीपाडवा निमित्त पाम ते शिर्डी पदयात्रा काढण्यात आली नंतर हनुमान जयंती निमित्त भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते आणि आता समाज सेवेच्या उद्देश्याने वृद्धाश्रमात धान्य वाटप करण्यात आले.
यावेळी सदर कार्यक्रमात साई सावली भजन मंडळ पाम चे अध्यक्ष श्री. सजिद मनोहर पिंपळे, खजिनदार श्री.अक्षय दीपक संखे, ग्राम पंचायत पाम माजी सदस्य श्री.अमित मनोहर संखे व साई सावली भजन मंडळ पाम चे सदस्य श्री.विलास द. पिंपळे, कल्पेश स. संखे, प्रणय कि.संखे, विकास ल.पिंपळे, अतुल चि.पिंपळे, पंकेश तु. वडे, महेश दा.संखे या सर्वानी वृद्धाश्रमात भेट देऊन धान्य वाटप केले.
यावेळी वृद्धाश्रमात धान्य वाटप केल्या बद्दल साई सावली भजन मंडळ, पाम चे आभार व्यक्त करण्यात आले.
Comments
Post a Comment