विश्वास फाउंडेशन च्या वतीने बोईसर येथे इफ्तार पार्टी चे आयोजन

विश्वास फाउंडेशन च्या वतीने बोईसर येथे इफ्तार पार्टी चे आयोजन 

बोईसर :दिनांक 15/4/2023 रोजी बोईसर येथे विश्वास फाउंडेशन तर्फे जामा मस्जिद येथे इफ्तार पार्टीत सन्माननीय रविंद्र फाटक ह्यांच्या उपस्थितीत व डॉ.विश्वास वळवी ह्यांच्या अध्यक्षे ते खाली भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले होते.

मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून मुस्लिम बांधव रोजा साजरा करत आहेत.या महिन्यात मुस्लिम समाज बांधव इतर समाजातील लोकांना इफ्तार पार्टीसाठी निमंत्रण देत असुन यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्य भावना वाढते.

यावेळी पवित्र रमजान महीन्यात विश्वास फाउंडेशन च्या वतीने आयोजित इफ्तार पार्टी मध्ये सन्माननीय रविंद्र फाटक व विश्वास फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष - डॉ. विश्वास वळवी यांनी मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान च्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी सदर कार्यक्रमात विश्वास फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष - डॉ , विश्वास वळवी , शिवसेना आमदार तथा संपर्क प्रमुख - रविंद्र फाटक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा बोईसरचे उपसरपंच नीलम संखे , शिवसेना शहर प्रमुख मुकेश पाटिल , शिवशक्ती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटिल, जि प सदस्य महेंद्र भोने, सामाजिक कार्यकर्ते अतुल देसाई , बोईसर मस्जिद चे अध्यक्ष रफीक शेख़, महेबुब पठाण, मकसूद खैरानी , अलताफ शेख़ , अजीज मेमन , आरिफ मेमन , राहिल पठाण, तसेच बोईसर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रदीप कसबे व इतर मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

बोईसर येथे जामा मस्जिद येथे विश्वास फाउंडेशन आयोजित इफ्तार पार्टी चे नियोजन इल्यास पठाण यांनी केले होते.

 

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी