तारापुर औद्योगिक क्षेत्रातील नैसर्गिक नाले 15 दिवसात होणार बंद

तारापुर औद्योगिक क्षेत्रातील नैसर्गिक नाले 15 दिवसात होणार बंद

काही कंपन्याना आम्ही ब्लैकलिस्ट केलेले आहे - डी.के.राउत

बोईसर : नैसर्गिक नाल्यात सोडण्यात येत असलेल्या केमिकल युक्त पाण्याच्या विरोधात पाम, कुंभवली, कोलवडे या तिन्ही गावांच्या ग्रामपंचायतींनी ठराव करून या पूर्वी देखील ग्रामस्थांनी संबधित अधिकाऱ्याना निवेदन देण्यात आले होते परंतु कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे आता वाढत्या प्रदुषणा बाबत या तिनही ग्रामपंचायतीने  रणशिंग फुंकले आहे. कारखान्यातून  सोडण्यात येणारे रसायनयुक्त पाण्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

त्यामुळे काही दिवसा पूर्वी या तिन्ही ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी गावाकडे वाहून जाणारे नैसर्गीक नाल्यात मातीचे भराव टाकून बंद करण्यात आले होते. त्या संदर्भात दिनांक 06/04/2023 रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळ व औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त सभेचे आयोजन टिमा सभागृहात केले होते त्यावेळी टिमाचे पदाधिकारी व तिन्ही ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना देखील निमंत्रण देण्यात आले होते.

यावेळी तिन्ही ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी वाढत्या प्रदुषणा बाबत नागरिकांना होणारा त्रास व या नैसर्गीक नाल्यातुन केमिकल युक्त पाण्यामुळे बाधित झालेले विहिर, तलाव तसेच बोर व  शेती नापीक झाली आहे तसेच काही कंपण्या नियमांचे उल्लंघन करुन पाण्याच्या मीटर मध्ये जुगाड़ करून पाण्याचा गैरवापर करत असत त्यामुळे काही केमिकल माफिया कंपनी तुन टॅंकर द्वारे केमिकल युक्त पाणी या नैसर्गीक नाल्यात सोडत असतात अश्या माफियाना पकडण्या साठी महाराष्ट्र प्रदुषण मंडळाला काही मदत हवी असेल तर प्रदुषण मंडळाचे अधिकारी, पोलीस व गावातील 5 जणाची कमिटी बनवू अश्या सर्व विषयांवर चर्चा करत लवकरात लवकर ठोस कारवाई करण्यासाठी जोरदार मागणी केली.

 येत्या 15 दिवसात औद्योगिक क्षेत्रातील सर्वच प्रदुषित नाले बंद करून उपाययोजना केली जाईल: प्रशांत गायकवाड - उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ तारापुर -1

50 वर्षात गावाचा विकास झाला तसेच चांगला काम करताना कंपनी तील 100 पैकी 10 जण पुढे येत असतात आम्ही वारंवार प्रदुषण बद्दल सांगितले परंतु कोणी समजत नाही अश्यामुळे आम्ही काही कंपनी ना ब्लैकलिस्ट केले आहे. आणि कोणती बाहेर ची टीम आल्यावर काही मालक कंपनी बाहेरुन टाळे बंद करुन ठेवतात: डि के राऊत - माजी टिमा अध्यक्ष

जर 15 दिवसात नैसर्गीक नाले बंद करून  नैसर्गिक नाल्यातील प्रदूषण कमी नाही केले तर 16 व्या दिवशी आम्ही तिन्ही ग्रामपंचायत मिळून महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ कार्यालयावर मोर्चा काढू :कुंदन संखे - शिवसेना नेते

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी