तारापुर औद्योगिक क्षेत्रातील नैसर्गीक नाले ग्रामपंचायतीने केले बंद

तारापुर औद्योगिक क्षेत्रातील नैसर्गीक नाले ग्रामपंचायतीने केले बंद 

प्रदुषणा बाबत पाम, कुंभवली, कोलवडे ग्रामपंचायत आक्रमक 

बोईसर : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत आणि मोठी मानली जाणारी तारापूर औद्योगिक वसाहत आता प्रदुषणाच्या बाबतीत देखील उच्च स्थानावर झळखत आहे. या वाढत्या प्रदुषणाचा धोका परिसारातील लोकांच्या जीवितास निर्माण झालेला असुन प्रशासन यावर ठोस उपाययोजना करत नसल्यामुळे आज  परिसरातील जनतेच्या मनात भयंकर संतापाची लाट पसरली आहे.

आज कित्येक वर्षापासून एम. आय. डी. सीत प्रदुषण विभाग, उप अभियंता बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग, असे प्रत्येक सरकारी कार्यालय असुन यातील अधिकारी ह्या प्रदुषणा कडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत  त्यामुळे आता प्रदुषणा बाबतीत पाम, कुंभवली, कोलवडे या ग्रामपंचायतीने स्वःत पुढाकार घेतला आहे.

एम.आय.डी.सी तील उद्योजक केमिकल माफियांना हाताशी धरून नैसर्गीक नाल्यात बारमाही हजारों लीटर रासायनिक पाणी सोडण्यात येते त्यामुळे येथील सुपीक शेती नापीक झाली आहे. त्यावर कोणतीही लागवड करू शकत नाही व केमिकल युक्त पाण्यामुळे गावाची परिस्थिति भयानक झाली आहे.यामुळे काही दिवसा पूर्वी पाम, कुंभवली, कोलवडे या ग्रामपंचायतीने थेट सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी तारापूरातील औद्योगिक विकास महामंडळाच्या उपअभियंताना घेराव घालण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी त्यांना या बाबतीत पत्र देऊन इशारा देण्यात आला होता आणि आज त्याचीच सुरवात म्हणून

 

आज दिनांक 30/03/2023 रोजी या तिन्ही ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच, व सदस्यानी नैसर्गीक नाल्यात माती टाकून भरावं करत गावाकडे वाहून येणारा केमिकल युक्त पाणी बंद करण्यात आले आहे .सदर या आंदोलनातून जेणे करुन अधिकाऱ्याना जाग यावे आणि या माध्यमातुन मुख्यमंत्री पर्यंत संदेश जावा तसेच या एम.आय.डी.सी त रोजगार निर्माण झाला पाहिजे तसेच लोकांना आनंद वाटला पाहिजे परंतु अश्या प्रदुषणामुळे तारापुरच नाव प्रदूषित म्हणुन घेतला जातो. आणि ही एक लाजेरवाणी बाब आहे. त्यामुळे ही  कारवाई नसून  धमकी वजा इशारा  आहे. यापुढचे आंदोलन हे आम्ही तिन्ही ग्रामपंचायती मिळून अधिकाऱ्याच्या कार्यालय वर व नंतर मग रस्त्यावर काढू असा ही इशारा यावेळी देण्यात आला आहे.

यावेळी नैसर्गीक नाले बंद या आंदोलनात कुंभवली गावच्या  सरपंच ऍड. तृप्ती कुंदन संखे, पाम गावच्या सरपंच दर्शना पिंपळे, कोलवडे गावचे सरपंच कुंजल संखे तसेच उपसरपंच हेमांगी संखे,अमित संखे, मनोज पिंपळे यांसह ग्रामपंचायतीचे सदस्य मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला विशेष म्हणजे या लढ्याला पाठबळ देण्याकरिता जिह्यातील शिवसेनेचे नेते कुंदन संखे यांनीही उपस्थिती देऊन ग्रामस्थांची बाजू मांडली यावेळेस पर्यावरण दक्षता मंचचे मनिष संखे, देखील उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी