*स्थानिक जनविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रविण संखे यांनी महिलांसाठी उद्योग व व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे केले आयोजन !*
*स्थानिक जनविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रविण संखे यांनी महिलांसाठी उद्योग व व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे केले आयोजन !* बोईसर : दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी स्थानिक जनविकास प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेतर्फे महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी महिलांसाठी उद्योग व व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन बोईसर येथील धनानी नगर येथे करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत हिरकणी महिला प्रभाग संघ संस्था बोईसर पदाधिकारी सौ.अपूर्वा ठाकूर , BDSP सौ. राधा शाहू , सौ. विभाता राऊत , सौ. प्रियंका पाटील व स्थानिक जनविकास प्रतिष्ठान धनानी नगर विभाग महिला अध्यक्षा सौ.रुपाली पिसाळ उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत प्रतिष्ठानच्या महिला अध्यक्षा सौ.रुपाली पिसाळ यांनी पुष्पगुच्छ देऊन केले . सदर कार्यक्रमात महिलांशी संबंधित विविध व्यवसाय व उद्योगा विषयी माहिती महिलांना अभियानाच्या पदाधिकारी यांनी समाधानकारकपणे दिली. तसेच स्थानिक जनविकास प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या महिला मार्गदर्शन शिबिरात सुमारे धनानी नगर , कृष्णा...