जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत भव्यदिव्य अशा नूतन नांदगाव ग्रामसचिवालयाचे उदघाटन

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत भव्यदिव्य अशा नूतन नांदगाव ग्रामसचिवालयाचे उदघाटन

ग्रामसचिवालयाचे उदघाटन मनसे नेते अभिजित पानसे यांच्या हस्ते

बोईसर: पालघर जिल्ह्यातील नांदगाव गावात जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत भव्यदिव्य अशा नूतन ग्रामसचिवालयाचा उदघाटन सोहळा मनसेचे नेते अभिजित पानसे यांच्या हस्ते लाल रिबीन कापून आणि नामफलकाचे अनावरण करून मान्यवरांच्या व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. 

देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या नांदगाव गावातील हुतात्म्यांना स्मरण करून, नांदगाव ग्रामसचिवालय कार्यालयातून तळागातील लोकांच्या विकासाला आता हातभार लागणार असून, यासाठीचा संघर्ष आणि या चांगल्या स्तुत्य कामात लाभलेल्या सहकार्याचे कौतुक सरपंच समीर मोरे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. या सामाजोपयोगी वास्तूचा सर्व समाजातील लोकांना लाभ होणार असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अपेक्षित असलेले काम समीर मोरे करीत असल्याचे गौरवोद्गार अभिजित पानसे यांनी काढून, आता नांदगाव गावाला खऱ्या अर्थाने नवनिर्माणाचे तोरण लागणार असल्याचे पानसे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. तसेच समीर मोरे आणि त्यांची टीम याउपरही आणखीन स्तुत्य काम करून मनसे चळवळ संपूर्ण जिल्ह्यात पुढे नेतील अशी कौतुकाची थाप नाशिकचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी दिली.  दीपप्रज्व्लन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून सुरु झालेल्या नीट नेटक्या आणि देखण्या कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत चोख होते.

यावेळी गावातील आणि पंचक्रोशीतील जनता, मनसेचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मनसे पदाधिकारी, इतर सर्व संस्थांचे आणि मंडळाचे अध्यक्ष – उपाध्यक्ष तसेच पदाधिकारी आणि ग्रामस्थ मंडळी व पत्रकार बांधव उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच समीर मोरे यांनी केले, सूत्रसंचालन उपसरपंच धीरज गावड यांनी तर मनिष पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी