सेवा आश्रम कनिष्ठ महाविद्यालय मुरबे येथे रंगला रानभाज्या महोत्सव
सेवा आश्रम कनिष्ठ महाविद्यालय मुरबे येथे रंगला रानभाज्या महोत्सव
बोईसर: सेवा आश्रम कला, वाणिज्य व तांत्रिक कनिष्ठ महाविद्यालय मुरबा येथे मंगळवारी रानभाज्या महोत्सव आणि वृक्षरोपणाचा कार्यक्रम प्राचार्य वंदना सखाराम राउत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वृद यांनी आयोजन केले होते.
शेती किंवा लागवड न करता निसर्गत : च उगलेल्या या भाज्यांना रानभाज्या म्हणतात. आपल्या भारत देशामध्ये 1530 पेक्षा अधिक रानभाज्यां आहेत त्यापैकी काही भाज्या आपल्याला माहित आहेत तर काही भाज्या विषयी काहीच माहित नाही. रानभाज्या ह्या डोंगरदऱ्यात, कड्या कपारीत उगतात तसेच आधुनिक युगामध्ये बाजारामध्ये ज्या भाज्या मिळतात त्यासाठी रासायनिक खताचा व औषधांचा ही वापर केला जातो यामुळे भाज्यामधील जीवनसत्व नष्ट होतात आणि ते मनुष्यच्या जीवनासाठी लागणारी जीवनसत्व न मिळता अनेक आजारांना आमंत्रण देतात त्यामुळे मानवाचे आयुर्माण कमी होत चालले आहे. आणि हे वाढविण्यासाठी आपल्याला रानभाज्यांचा आहारामध्ये जास्तीत जास्त वापर करणे हे एक काळाची गरज आहे. यासाठीच रानभाज्यांचे परिचय विद्यार्थ्यना व्हावा या दृष्टीने 34 रानभाज्या महोत्सवाचे आयोजन मुरबे महाविद्यालयात करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील विद्यार्थिनींनी मान्यवरांचे स्वागत गीत गात प्रमुख अतिथीचे स्वागत केले. यावेळी आळू, शेवग्याचा पाला, करटोले, कपाळ फोडी, सुरण, वास्ते, बाफली, तोंडली, कुरूडू, टाकला, पेंढरा, आंबोशी, खापरा, आघाडा, आळंबी, दिवेली, उडदा चापला, तांदुळजा, मेका, आंबाडी, माट भाजी,कोची, चीवळी, चाई, कलमी, लोती, खुरासणी चापाला, पोकळ्याची भाजी, रान केळी, शतावरी, इत्यादी ३४ प्रकारच्या रानभाज्या सादर करत त्यांचे मानवी जीवनात काय महत्त्व आहे याबाबतीत मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी माहिती दिली.
यावेळी कार्यक्रमात सेवा आश्रम विद्यालयाचे फिट पर्सन अशोक उमरे , रोटरी क्लबच्या अध्यक्षा वैशाली शिंदे, मुराबा गावाच्या सरपंच मोनालिसा तरे, माजी सरपंच प्रज्ञा तरे आणि ग्रामपंचायत चे सदस्य उपस्थित होते.
Comments
Post a Comment