न्याय मिळत नसल्यामुळे कुटुंबासहीत घेतला होता आत्मदहनाचा निर्णय
न्याय मिळत नसल्यामुळे कुटुंबासहीत घेतला होता आत्मदहनाचा निर्णय
एखाद्या महिलेला न्यायासाठी आत्मदहनाची वेळ आणाली जाते हि एक आपल्या जिल्ह्याची शोकांतिका आहे - बहुजन समाज पार्टीचे पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव
पालघर : न्याय मिळत नसल्यामुळे दांडी ग्रामपंचायत हद्दीत राहणारी कविता कल्पेश मांगेला, पती कल्पेश मांगेला व दोन मुलांसह संपूर्ण कुटुंबाने १५ ऑगस्ट २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला होता.
सविस्तर वृत्त असे की, पालघर तालुक्यातील मौजे दांडी गावातील एक मासे विक्रेता मासे विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारी कविता कल्पेश मांगेला, पती कल्पेश मांगेला व दोन मुलांसह दांडी ग्रामपंचायत हद्दीत वडिलांनी दिलेल्या जागेत मासे विक्री करून स्व:कष्टाने मिळवलेल्या कमाईत घर बांधून रहात आहे. रात्री मुंबई येथे जाऊन मासे खरेदी करत बोईसर दांडी परिसरात दिवसभर मासे विक्री करून तीन ते चार तास घरात रहात असलेली कविताला आपल्या घरात मासांची टोपली नेण्यासाठी असलेला रस्ता जेव्हा शेजारील भूवनेश्वर परशुराम आरेकर नामक व्यक्तींकडून अतिक्रमण केले होते तेव्हा कविता ही न्यायासाठी गेल्या तीन वर्षापासून स्थानिक ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हापरिषद, स्थानिक पोलीस ठाणे, मेरीटाईन बोर्ड, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आजी माजी सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार यांच्या दरबारात न्यायासाठी फिरत होती परंतु न्याय मिळत नसल्यामुळे प्रशासन व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना जाग आणण्यासाठी निराश झालेल्या कविताच्या पाठीशी बहुजन समाज पार्टीचे पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश शांताराम जाधव खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिल्यानंतर कविता व तिच्या कुटुंबीयांना मोठा आधार मिळाला व तो आज सार्थक झाल्याचेही कविता हिने सांगितले आहे.
कविता मांगेला यांच्या घरालगत महाराष्ट्र शासन ( कस्टम विभाग) यांची २० गुंठे जमिन असून ती जमिन मच्छीमार बांधवाना मासे सुकविण्यासाठी देण्यात आलेली असून अल्प प्रमाणात मासेमारी होत असल्यामुळे सदर जमिनीवर मासे सुकविण्याचे काम बंद असल्यामुळे भुवनेश्वर परशुराम आरेकर नामक व्यक्तीने सदर जमिनीवर अतिक्रमण करून कविता मांगेला यांच्या घराकडे जाणारा रस्ता पत्रे लावून बंद केला होता. गेल्या तीन वर्षांपासून कविता आपला मासे भरलेली टोपली कशीबशी अडचणीच्या रस्त्यातून नेत होती. तीन वर्षांपासून जिल्हा प्रशासनाला वेळोवेळी तक्रार देऊन देखील हतबल झालेली कविता व तिच्या कुटुंबीयांनी १५ ऑगस्ट २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला होता व तसे दिनांक २० जुलै रोजी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांची समक्ष भेट घेत निवेदन ही दिले होते. त्या अनुषंगाने सातपाटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ढोले यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत कविता यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन देऊन मत परिवर्तन करण्याचे प्रयत्न केले परंतु वारंवार मारहाण होऊन देखील सातपाटी पोलिसांकडून सहकार्य न मिळाल्यामुळे व्यथित झालेली कविताला नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक ढोले यांच्या आश्वासनावर विश्वास बसत नव्हता. शेवटी सदर प्रकरणाची चौकशी तारापुर मंडळ अधिकारी म्हणून नुकतेच नेमणूक झालेले मंडळ अधिकारी सुनील राठोड यांनी शनिवारी १२ ऑगस्ट रोजी घटनास्थळी पाहणी करत न्याय देण्याचे आश्वासन कविता यांना दिला होता त्यानंतर सोमवार दिनांक १४ ऑगस्ट रोजी बहुजन समाज पार्टीचे पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश शांताराम जाधव , पत्रकार विकास पाटील, पत्रकार सुशांत संखे, पत्रकार स्वप्निल पिंपळे यांनी मंडळ अधिकारी सुनील राठोड, तहसीलदार शेंडगे, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पालवे यांची प्रत्यक्ष भेट घेत कविता मांगेला यांनी आत्मदहन का करु नये असा थेट प्रश्न उपस्थित केला त्यानंतर खडबडून जागा झालेला जिल्हा प्रशासन कामाला लागून अखेर कविता मांगेला या महिलेला व तिच्या कुंटुबाला आज प्रत्यक्षात न्याय मिळाला असुन तीला घरात जाण्यासाठी रूंद असा रस्ता मिळाला आहे. त्यानंतर तीला झालेला आनंद आज गगनात मावेनासा झाला आहे.
कविता मांगेला यांच्या घरालगत असलेला अतिक्रमित भूखंड हा सातबारा प्रमाणे कस्टम विभागाचा असून त्या भूखंडावर ग्रामपंचायत दांडी यांनी तो भूखंड गावठाण असल्याचे माहिती अधिकार स्पष्ट केले आहे तर मेरीटाईन बोर्डाने तो भूखंड अतिक्रमण करणाऱ्या भूवनेश्वर परशुराम आरेकर यांना नोटीस देत सात दिवसांत अतिक्रमण हटविण्याची नोटीस बजावली होती परंतु प्रत्यक्षात कविता मांगेला या महिलेला न्याय देण्यासाठी या अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावण्यास असमर्थता दर्शविली असून कस्टम विभागाच्या भूखंडावर आपली मालकी दाखवत या अधिकाऱ्यांना नेमके काय साध्य करावयाचे होते हा ग्रहण प्रश्न उपस्थित झालेला असून कविताच्या घराकडे जाण्यास रस्ता मोकळा करून देऊन कमी कालावधीत एका पिडीत महिलेस रात्री उशिरापर्यंत न्याय मिळवून देणारे कर्तृत्ववान मंडळ अधिकारी सुनील राठोड उर्वरित अतिक्रमण हटवून खरोखरच न्याय देतील असे दांडी ग्रामस्थांकडून बोललं जात आहे.
न्यायासाठी तीन वर्षांपासून वणवण भटकंती करणाऱ्या कविता व तिच्या कुटुंबीयांनी आत्मदहनाचा घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा असून अशी वेळ आणणाऱ्या अधिकाऱ्यांना सर्व प्रथम निलंबित केले पाहिजे एखाद्या महिलेला न्यायासाठी आत्मदहनाची वेळ आणाली जाते हि एक आपल्या जिल्ह्याची शोकांतिका आहे. असे प्रखर मत बहुजन समाज पार्टीचे पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश शांताराम जाधव यांनी मांडले आहे.
"शासनाच्या सर्व अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केले, अनेक लोकप्रतिनिधींना भेटली, राजकीय पक्षातील नेत्यांना भेटली परंतु गेल्या तीन वर्षांपासून कुणीही मला न्याय देण्यासाठी पुढे सरसावले नाही. उलट माझी दिशाभूल करण्याचे काम केले परंतु देवासारखे पाठीशी उभे राहणारे सुरेश जाधव, पत्रकार विकास पाटील, पत्रकार सुशांत संखे, पत्रकार विजय घरत, पत्रकार स्वप्निल पिंपळे तसेच मंडळ अधिकारी सुनील राठोड व पोलीस निरीक्षक लोढे यांनी मला खूप सहकार्य केल्यामुळे मला आज न्याय मिळाला आहे. आत्मदहनाचा घेतलेला निर्णय जरी चुकीचा असला तरी मला तो निर्णय नाईलाजास्तव घ्यावा लागला : कविता कल्पेश मांगेला - ग्रामपंचायत दांडी"
Comments
Post a Comment