बहुजन विकास आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते संपन्न
बहुजन विकास आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते संपन्न
जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातुन सर्वसामान्य जनतेची समस्या सोडवून न्याय देण्याचा प्रयन्त केला जाईल - सरावली प्रभाग संघटक अजिज मेमन
बोईसर : बहुजन विकास आघाडीचे बोईसर शहरातील अवधनगर येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जनसामान्यांना त्यांच्या तक्रारी आणि समस्या घेऊन जाणे आता सुकर होणार असुन जनसंपर्क कार्यालयांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची कामे केली जातील. त्यांच्या समस्या-अडीअडचणी सोडवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास बहुजन विकास आघाडीचे सरावली प्रभाग संघटक अजिज मेमन यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला.
यावेळी महेंद्र राजपूत, युवा पालघर जिल्हा अध्यक्ष, पालघर तालुका अध्यक्ष कामनीष राउत, पालघर तालुका युवा अध्यक्ष अमर सावंत,पालघर तालुका युवा उपाध्यक्ष,हेमंत कदम,पालघर तालुका संपर्क प्रमुख,अजीज़ मेमन,सरावली प्रभाग संघटक, अविनाश मिश्रा, बोईसर तालुका अध्यक्ष, नितीन चौधरी, विभाग संघटक बोईसर, अभिनय चौधरी, युवा बोईसर विभाग कार्याध्यक्ष, विश्वनाथ घरत पालघर उपजिल्हाध्यक्ष, राजू सिंग, युवा उपशहर अध्यक्ष सदर कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थ तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. त्यांचे उपस्थितीत जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन सोहळा मोठया जल्लोषात पार पडला.
Comments
Post a Comment