सहाय्यक लेखा अधिकाऱ्याला दोन हजाराची लाच स्वीकारताना एसीबी ने रंगेहाथ पकडले
सहाय्यक लेखा अधिकाऱ्याला दोन हजाराची लाच स्वीकारताना एसीबी ने रंगेहाथ पकडले
पालघर : जिल्हा परिषद पालघर येथील सहाय्यक लेखा अधिकारी रमेश यशवंत मौळे (४५) यांना पालघरच्या लाचलुजपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले आहे.
जिल्हा परिषदेच्या लेखा शाखा विभागात वर्ग- 3 कर्मचारी म्हणून कार्यरत असणाऱ्या रमेश मौळे यांनी ग्रामपंचायत कासटवाडी-रामनगर (जव्हार) येथे नळ पाणीपुरवठा केलेल्या कामाचे बिल मंजूर करून देण्यासाठी रमेश मौळे याने तक्रारदाराकडे दोन हजार रुपये लाचेची मागणी करून दुपारी आपल्या कार्यालयात स्वीकारताना प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले यात आरोपीला ताब्यात घेण्यात आले असुन पुढील कारवाई चालू आहे.
विभागाचे पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे, पोलीस निरीक्षक शिरीष चौधरी व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने तब्बल नऊ कारवायांमध्ये लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची माहिती लाचलूचपत प्रतिबंधक विभागातील पोलिस उपअधीक्षक दयानंद गावडे दिली.
नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा.
Comments
Post a Comment