बोईसर मध्ये अवैध इमारतीत शॉक लागून मजदूराचा मृत्यू

बोईसर मध्ये अवैध इमारतीत शॉक लागून मजदूराचा मृत्यू

बोईसर: सरावली ग्रामपंचायत हद्दीत सरकारी भूखंडावर सुरू असलेल्या बेकायदेशीर इमारतीचा बांधकाम सुरू असताना वीजेचा करंट लागून एका मजदूराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे.

दिनांक २४ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११ वाजता सरावली ग्रामपंचायत हद्दीत शुक्ला कंपाऊंड व शितल नगर दिवाकर चाळीला लागून सरकारी भूखंडावर असलेल्या चाळीतील रूम दिलीप नावाचा दलाला द्वारे बाहेरील इसमास विक्री करून जुन्या रूम तोडून तेथे दुमजली इमारतीचे बांधकाम जोरात सुरू आहे. सदर बांधकाम ग्रामपंचायतीकडून बांधकाम केलेल्या गटारीवर सुरू असून महावितरण कंपनीच्या ११ के व्हि वाहिनीच्या जवळच बांधकाम सुरू केल्यामुळे दुमजल्यावर काम सुरू असताना विद्युत वाहिनीच्या संपर्कात येत जोरदार करंट लागून एका निष्पाप मजदूराचा मृत्यू झालेला आहे. महत्वाचे म्हणजे या घटनेची प्राथमिक माहिती स्थानिक पोलिसांपर्यंत देण्यात आलेली नसून घटना घडल्यानंतर देखील त्या ठिकाणी कुणीही उपस्थित नसल्यामुळे नेमका त्या मजदूराचा मृतदेह कुठे नेण्यात आला आहे या बाबत शंका व्यक्त केली जात आहे.

दरम्यान सरकारी भूखंडावर अशा प्रकारे अवैध बांधकाम सुरू असताना महसूल अधिकारी व स्थानिक ग्रामपंचायत बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे विजेचा करंट लागून एक निष्पाप जीवाचा बळी गेलेला असून स्थानिक पोलिसांना प्राथमिक माहिती न देताच मजदुराचा मृतदेह घेऊन लंपास झालेल्या ठेकेदाराचा नेमका उद्देश आहे तरी काय ?

सदर घटनेची माहिती स्थानिक पत्रकारांद्वारे समजलेली असून सदर घटनेचा तपास सुरू केलेला आहे. लवकरच याप्रकरणी उचित कार्यवाही केली जाईल असे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी सांगितले आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी