पाम ग्रामपंचायत तर्फे “मेरी माटी मेरा देश”अभियाना अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन
पाम ग्रामपंचायत तर्फे “मेरी माटी मेरा देश”अभियाना अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन
पालघर :-पालघर तालुक्यातील पाम ग्रामपंचायत येथे ‘मेरी माटी मेरा देश’ अभियाना अंतर्गत आझादी का अमृत महोत्सवाच्या समारोपाच्या निमित्ताने विविध अभियानाचे आयोजन करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता येत्या १५ ऑगस्टला होत आहे. त्यानिमित्त ‘मेरी माटी मेरा देश’ या संकल्पनेला जनमाणसांपर्यंत विविध उपक्रमांच्या माध्यमातून पोचविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्या अंतर्गत राज्य शासनाच्या निर्देशांनुसार जिल्ह्यातील प्रत्येक ग्राम पंचायत स्तरावर ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम राबविण्याचे नियोजन जिल्हा प्रशासन करीत आहे त्यानिमित्ताने पाम ग्रामपंचायत तर्फे ध्वजावरण, शिला फलक अनावरण, वसुधा वंदन अंतर्गत वृक्ष लागवड कार्यक्रम, कलश, पंच प्रण शपथ तसेच स्वातंत्र्य विरोंको वंदन उपक्रमांतर् शहीद स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात पाम गावचे सरपंच दर्शना दत्तात्रेय पिंपळे, उपसरपंच मनोज पिंपळे, ग्रामविकास अधिकारी प्रकाश पाटील, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील नागरिक उपस्थित होते
Comments
Post a Comment