गुंदले ग्रामपंचायत हद्दीत परवानगी न घेताच बांधली ईमारत
गुंदले ग्रामपंचायत हद्दीत परवानगी न घेताच बांधली ईमारत
पालघर: मौजे गुंदले ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य रस्त्यालगत नवीन इमारतीच्या बांधकामाला ग्रामपंचायती कडून ना हरकत दाखला न घेताच बांधकाम सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.
गुंदले ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य रस्त्यावरील बस स्टॉप समोर रोड मार्जिनल स्पेसमधे एका इमारतीचे बांधकाम जोमाने सुरू असून प्रशासन मात्र त्या अवैध बांधकामाला आधार देत असल्याचे निदर्शनास येत आहे.
कोणत्याही नवीन इमारतीच्या बांधकामाकरीता ग्रामपंचायतीकडून ना हरकत दाखला घेऊन जिल्हा प्रशासनाची परवानगी घेऊनच बांधकाम सुरू करणे आवश्यक असताना इमारतधारकाने प्रशासनाला न जुमानता कुठलीही परवानगी न घेता मुख्य रस्त्यावरील रोड मार्जिनल स्पेसमधे इमारतीचे बांधकाम सुरू करून भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी प्रशासनाला भाग पाडले आहे. तर रोड मार्जिनल स्पेसमधे अशा प्रकारे अवैध बांधकाम सुरू असल्यामुळे रस्यावर होणाऱ्या अपघातांना नेमका जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तसेच अश्या अवैध बांधकामाला ग्रामपंचायत कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे.
"सदर बांधकामाला ना हरकत दाखला दिलेला नसून इमारतधारकाने तसे पत्र दिलेले नाही. सदर बेकायदेशीर बांधकामाची जिल्हा प्रशासनाला लेखी तक्रार देण्यात येईल: शृंखला पामाळे - ग्रामसेवक ग्रामपंचायत गुंदले"
Comments
Post a Comment