जबरीचोरी व घरफोडी करण्याऱ्या सराईत चोरांना पकडण्यात विरार गुन्हे शाखेला आले यश

जबरीचोरी व घरफोडी करण्याऱ्या सराईत चोरांना पकडण्यात विरार गुन्हे शाखेला आले यश 

विरार : जबरीचोरी व घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक करुन सात गुन्हयाची उकल करण्यात विरार पोलीस ठाणे -गुन्हे प्रकटीकरण शाखेने उत्तम कामगिरी केली आहे.

दिनांक 06 ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी 7.10 च्या सुमारास विद्या मुकुंद गुरव ह्या कामावर जात असताना यूनिकॉर्न मोटार सायकलवरील एका अनोळखी इसमाने गळ्यातील चेन जबरीने खेचून घेऊन पळून गेल्याबाबत विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळी धाव घेऊन तक्रारदार यांनी वर्णन केलेल्या इसमाचा गुप्त बातमी मार्फत शोध घेऊन आरोपी शंकर हाल्या दिवा वय (36 वर्ष ) रा. कातकरीपाडा, विरार पूर्व यास ताब्यात घेवून तपास केला असता सदर गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असुन विरार पोलीस ठाण्यात अभिलेखावरील एकूण 5 गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.

तसेच आरोपी कडे अधिक तपास केला असता इतर आरोपी जैक उर्फ़ कुंदन सुरेंद्र नाक (वय 23 वर्ष ) व गोविंदा अनिलकुमार गोंड ( वय 21 वर्ष ) यांनी चोरी व घरफोडीचे गुन्हे केल्याचे माहिती प्राप्त झाली तसेच आरोपीनी विरार व गणेशपूरी पो. ठाणे,( जि. ठाणे ग्रामीण ) च्या अभिलेखावरील 2 गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर आरोपीकडून घरफोडीचे एकूण 7 गुन्हे उघड घेऊन एकूण 2,30,000/- रु कि. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सदरची कामगिरी मा. पोलीस उपआयुक्त,परिमंडळ -3, सुहास बावचे, तसेच मा. सहायक पोलीस आयुक्त, विरार विभाग रामचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, दिलीप राख (गुन्हे ) तसेच गुन्हे प्रकटी करण शाखेचे अधिकारी स.पो.नि ज्ञानेश फडतरे, पो.हवा. सचिन लोखंडे, संदीप जाधव, ईंद्रनिल पाटील, संदीप शेरमाळे, विशाल लोहार, योगेश नागरे, पो.अं. मोहसीन दिवाण, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, रोशन पुरकर, दत्तात्रय जाधव, व फूल सोनार यांनी केलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी