अत्याचार करून निर्घुण हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी - सूर्यवंशी क्षत्रिय मराठा मंडळ
अत्याचार करून निर्घुण हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी - सूर्यवंशी क्षत्रिय मराठा मंडळ
पालघर : नऊ वर्षीय चिमुकली वर अत्याचार करून निर्घुण हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सूर्यवंशी क्षत्रिय मराठा मंडळ, मुंबई परिसर यांनी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी पालघर यांना निवेदन देण्यात आले.
जळगाव जिल्ह्यातील भडगांव तालुका येथील गोंडगांव गावात नऊ वर्षीय चिमुकलीवर एका १९ वर्षीय तरुणाने अत्याचार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी तरुणाने चिमुकलीचा हत्या करून गुरांच्या गोठ्यात कुटाराच्या ढिगाऱ्याखाली चिमुकलीचा मृतदेह लपवला होता. आरोपीवर भडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखा जळगांव यांच्या कडून आरोपीला अटक करण्यात आली आहे. याबाबतीत आरोपीला आणि आरोपीला मदत करणाऱ्या सह आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी असंख्य नागरिकांनी मुक मोर्चा काढून सदर घटनेचा निषेध करत बालिकेच्या मारेकऱ्यांची चौकशी सीआयडी मार्फत करण्यात यावी तसेच चौकशी कामी निवृत्त न्यायाधीश यांची चौकशी समिती नियुक्त करण्यात यावी. आणि हा खटला जलदगतीने न्यायालयात घेऊन विधितज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांच्याकडे ह्या सोपवावा अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर मयत बालिकेच्या घरची परिस्थिती हालाखीची असून वडील अपंग आहेत.त्यांच्या कडे उत्पन्नाचे साधन नाही म्हणून या केसच्या येणारा खर्च हा शासनाने करावा. तसेच या कुटुंबाला आर्थिक हातभार द्यावा आणि पीडित चिमुकलीच्या मारेकऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी अशी मागणी सकल मराठा समाज न्याय समिती व पुरोगामी विचारसरणी असलेल्या संघटना भडगांव यांनी केली आहे.
यावेळी देवका मराठे, रोहिणी अंबोरे, ललिता पाटील, एकनाथ मराठे, बी.बी. सोनवणे, विजय मराठे, लक्ष्मण पाटील, धनंजय मराठे, मनोज मराठे, बंडू चव्हाण, अनिल मराठे, किरण मराठे, योगेश मराठे, नरेंद्र मराठे, आनंदा मराठे, अमोल मराठे हे उपस्थित होते.
Comments
Post a Comment