कारचालक आसिफ घाची याची हत्या करणाऱ्या दोन आरोपीना पकडण्यात पालघर पोलीसांना आले यश

कारचालक आसिफ घाची याची हत्या करणाऱ्या दोन आरोपीना पकडण्यात पालघर पोलीसांना आले यश


पालघर : आसिफ घाची यांचा अपहरण करुन खून करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन दाखल गुन्हयाची उकल करण्यात पालघर पोलीसांना यश आले आहे.

आसिफ गफार घाची वय 29 वर्ष रा. पालघर व्यवसाय रिक्शा व कारचालक असुन दिनांक 12/08/2023 रोजी सांयकाळी 5.00 वाजता रिक्शा स्टैंडवर तीन अनोळखी इसम भेटले त्यांनी नाशिक येथुन फॅमिली आणण्या करीता जायचे सांगितले त्याकारिता आसिफ याने त्याचा मित्र महेश सूर्यवंशी याच्याशी संपर्क करुन त्याच्या मालकीची इंर्टीका कार मांगविली त्यां गाडीचा नंबर एम. एच.48 सी. के.3716 असुन यात तीन अनोळखी इसमाना बसवून गाडीने रवाना झाले. त्यांनंतर आसिफ घाची यांची पत्नी व गाडी मालकाने आसिफ घाची यांना संपर्क झाला नाही त्यामुळे 13/08/2023 रोजी पालघर पोलीस ठाणे येथे आसिफ हरवले बाबत तक्रार दाखल केली त्यानुसार पोलीसांनी शोध सुरु केला दरम्यान आसिफ यांच्या पत्नी ने सांगितल्या प्रमाणे गाडी नाशिकला न जाता सिन्नर कडून समृद्धि महामार्गाच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली. त्यामुळे काहीतरी अघटित घडल्याच्या संशयाला पुष्टि मिळाल्याने तक्रार पुन्हा नोंंद करुन आसिफ यास अपहरण करून प्रवासी म्हणून त्याच्या वाहनात बसणाऱ्या तीन इसमांनी त्यांचे ताब्यातील गाडीसह चोरी करण्याच्या उद्देश्याने घेऊन गेले म्हणून त्यांच्याविरुद्ध पालघर पोलीस ठाण्यात कलम 379, 365, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यांअनुषंगाने सयुंक्त तपास पथके तयार करून तांत्रीक तपास केला असता सदरची गाडी ही नाशिक - सिन्नर टोल नाका तसेच समृद्धि हायवे मार्गे छतीसगड राज्यातील कुम्हारी टोल नाका या दिशेने गेल्याचे दिसून आले तसेच आसिफ घाची ऐवजी वाहन दूसरा इसम चालवित असल्याचे दिसले त्यामुळे आसिफ याचा पालघर पासून नाशिक पर्यंत विशेषत : घाटमार्ग मोखाडा ते नाशिक दरम्यान कसोशिने शोध घेतला असता त्यांचे शव हे मोरचुंडी ( निलमाती ) घाट येथे मोखाडा ते त्रंबकेश्वर दरम्यान रस्त्याचे काही अंतरावर झाडा झूडपात गळ्याला नायलॉनची दोरी करकचुन बांधलेल्या अवस्तेत मिळून आले. त्यामुळे सदर गुन्हयात कलम 302, 201 अशी वाढ करण्यात आली. त्यांनतर पालघर हद्दीत सखोल गोपनीय व तात्रीक तपास सुरु करून गोपनीय माहिती प्राप्त झाली कि, तिन्ही संशयीत हे यापूर्वी बोईसर भागात राहत होते. त्यानुसार तिन्ही आरोपीची नावे निष्पन्न केली 1) धर्मानंद उमाकांत जाल - वय 24 वर्ष , 2) सेसवा उर्फ़ प्रितम सांता मेहर -वय 25 वर्ष , 3) खुशीराम ऊर्फ राजु डोलामणी जाल हे तिन्ही  ओडीसा राज्याचे असुन धर्मानंद जाल याला ओडीसा राज्यातील त्याचे राहते गावी कोकडमाल जंगलातुन वाहनासह ताब्यात घेण्यात आले तसेच सेसवा ऊर्फ प्रितम मेहर यास नागपुर रेल्वे स्थानक येथुन ताब्यात घेण्यात आले तसेच तीसरा आरोपी खुशीराम ऊर्फ राजू जाल याचा शोध चालु आहे. तसेच गुन्हयात गेलेली इर्टीका कार क्र. एम. एच.48/ सी. के.3716 हस्तगत केलेली आहे व गुन्हयांचा पुढील तपास हा निता पाडवी, उप विभागीय अधिकारी, पालघर विभाग या करीत आहे.

वरील कामगिरी ही बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली निता पाडवी, उप विभागीय पोलीस अधिकारी, पालघर विभाग अनिल विभुते, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, दत्तात्रय किद्रे, पोलीस निरीक्षक, पालघर पोलीस ठाणे, सपोनि अमोल गवळी, नेमणुक सुरक्षा शाखा पालघर, सपोनि - मल्हार थोरात, पोउपनि - गणपत सुळे, स्वप्निल सावंत देसाई, पोहवा -राकेश पाटील, विजय ठाकुर, दिनेश गायकवाड, कैलाश पाटील, संदीप सरदार, दिलीप जनाठे, निकोळे, नरेंद्र पाटील, दिपक राउत, धांगडा, पोना- केंगार, पोशि - निकम, वैभव जामदार सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा,  पालघर व मसपोनि - मंजूषा शिरसाट, सफौ - सुभाष खंडागळे, पोहवा - अशोक तायडे, चंद्रकांत सुरूम, भगवान आव्हाड, पोना - सुयोग कांबळे, परमेश्वर मुसळे, पोशि - सागर राउत, मनोहर पाटील, आराख, डुबल, विशाल कांबळे सर्व नेमणुक पालघर पोलीस ठाणे यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे.


गेल्या 20 वर्षापासून एक आरोपी या विभागात राहत होता व दोन आरोपी हे 5 ते 6 महिन्या पासून या विभागात राहत असल्यामुळे या विभागाची संपूर्ण माहिती या लोकांना होती तसेच त्यांना गावी टूरिस्ट चा व्यवसाय करायचा असल्यामुळे त्यांनी नविन कोरी गाडी भाड्या वर घेऊन जाण्याचे पूर्व तयारी करुन आसिफ याला कट रचुन 3 आरोपीनी हत्या केली यात आसिफ याला मागे बसलेल्या आरोपीने दोरी ने गळा आवळला व बाजूला बसलेल्या आरोपी त्यांच्या अंगावर बसला जेणेकरुन तो हलु नये व तीसरा आरोपी हा गाडीच्या बाहेर उभा राहून कोणी गाडी येते कि नाही हे पाहण्यासाठी बाहेर उभा राहिला होता अश्या प्रकारे संपूर्ण नियोजन करुन आसिफ याची हत्या करण्यात आली तसेच यावेळी या तिन्ही आरोपी नी स्वत: च्या मोबाईल वापर न करता रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या मोबाईल द्वारे आसिफ याच्याशी संपर्क साधला होता त्यामुळे कोणतेही माहिती नसताना गोपनीय व तात्रीक तपासाच्या आधारे आरोपीना पकड़ण्यात आले यात आरोपीना पकडण्यासाठी पालघर पोलीसांची 6 पथके तयार केलेले असुन त्यात एकूण 40 ते 50 पोलीसांचा सहभाग होता. - बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी