कारखान्यांतील कामगाराची सुरक्षा रामभरोसे : बॉम्बे रेयॉन कारखान्यात 31 वर्षीय तरुणाने गमवला जीव
कारखान्यांतील कामगाराची सुरक्षा रामभरोसे : बॉम्बे रेयॉन कारखान्यात 31 वर्षीय तरुणाने गमवला जीव
बोईसर : कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शासनाने आखून दिलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून कारखानदारांनी कामगारांच्या सुरक्षेची योग्य काळजी न घेतल्यानेच बहुतांश अपघात ओढवले आहेत यात कारखान्यांत घडलेल्या अपघातांमध्ये कामगारांचा मृत्यू होत आहे.
अश्याच तारापुर औद्योगिक क्षेत्रातील बॉम्बे रेयॉन नावाने ओळखली जाणारी कपडा निर्मित कारखान्यात दिनांक २ जून रोजी पत्र्याच्या शेडच काम करत असताना वरून खाली पडून एका ३१ वर्षीय तरूण गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला होता.
सदर प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात ADR दाखल करत बोईसर पोलिस ठाण्यात प्रकरण वर्ग केलेला होता. कंपनी प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा दाखला या अपघातातून सरळ सरळ दिसत असताना या ३१ वर्षीय युवकाच्या मृत्यूला जबाबदार म्हणून ठेकेदारावर गुन्हां दाखल करत कंपनी प्रशासनाला मोकळीक देण्यात आली आहे. ना हक जीव गमवावा लागलेल्या या ३१ वर्षीय तरूणाला कंपनीकडून भरपाई न मिळावी म्हणून कंपनीकडून जबाबदार व्यक्ती म्हणून सुरक्षा अधिकारी व कंपनी प्रशासन यांना क्लीन चिट देत ठेकेदार राकेश लल्लन बिन व देखरेकदार अभिषेक सिंग यांच्यावर ३०४ अ प्रमाणे गुन्हां दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान केमिकल आणि टेक्सटाइल्स कंपनीत कामगारांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी ऑफिसरची नियुक्ती करणे बंधनकारक असताना व संपूर्ण जबाबदारी सुरक्षा अधिकारी ची असताना कंपनीच्या आवारात सुरक्षा उपकरणे न पुरवता कामगारांकडून कंपनी प्रशासन उंचावर काम करून घेत असताना असे अपघात घडत आहेत तर अशा अपघातांना कंपनी प्रशासन जबाबदार असून औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग या प्रकरणी नेमकी कुठली भूमिका घेत आहेत याबाबत सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरू असून बोईसर पोलिस ठाण्यात या प्रकरणी योग्य ती चौकशी करून कारवाई केली जाईल असे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी सांगितले आहे.
Comments
Post a Comment