बोईसर मध्ये दोन लाखाची मांगितल्याप्रकरणी पाच जणावर गुन्हा दाखल
बोईसर मध्ये दोन लाखाची मांगितल्याप्रकरणी पाच जणावर गुन्हा दाखल
बोईसर : बोईसर पोलीस ठाण्यामध्ये पाच जणावर दोन लाखाची खंडणी मांगितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यतिन पिंपळे यांचा ट्रान्सपोर्टचा धंदा असुन मे. सडेकर इनवायरो इंजीनियरींग लिमीटेड हाय सीओडी इटीपी वॉटर हे भूखंड क्रमांक इ. १३३ या कंपनीत आणुन सोडण्याच काम करतात परंतु दि. ३० जुलै २०२३ रोजी मे. सडेकर इनवायरो इंजीनियरींग लिमीटेड या कंपनीच्या गोडाऊन मध्ये स्टोरेज करण्यात आलेले हाय सीओडी इटीपी वॉटर हे मे. सडेकर इनवायरो इंजीनियरीगं लिमीटेड यांच्या भूखंड क्रमांक इ. १३३ या कंपनीत आणुन सोडत असताना यतीन पिंपळे ह्याचा वाहन चालक व मालकीचा टैंकर क्र. MH-06/ AQ-4164 हा कंपनी मध्ये नेत असताना 1) एम. के. अन्सारी, 2) दुर्गेश पाठक, 3) विकास सिहं, 4) विजय प्रसाद यानी टैंकर अडवुन काही एक कारण नसताना, यतीन पिंपळे यांच्या मालकीचा वरील नमुद क्रमाकांच्या टँकर जवळ जाऊन टँकरच्या व्हॉल मध्ये मालकाच्या परवानगीविना, खोडसाळपणा करून ड्रायव्हरला गाडीच्या कॅबीनमधुन खाली उतरवुन काहीएक कारण नसताना शिवीगाळी करून मारण्याची धमकी दिली व गाडीचे विनापरवानगी व्हिडीओ शुटींग करून टैंकर मध्ये घातक व बेकायदेशीर माल असुन ,तो डप करण्यासाठी आणला आहे व मालाची गळती होत असुन तुम्हाला सदरचे मॅटर मिटवायचे असेल तर २ लाख रुपये दयावे लागतील. अशी पैशांची मागणी केली. असे यतीन पिंपळे यांनी तक्रारीत नमूद केले आहे
तसेच दुस-या दिवशी ३१ जुलै रोजी सकाळी ११:०० वाजता बोईसर पोलीस ठाण्यात टैंकर सोडण्या संदर्भात यतीन पिंपळे हे विचारणा करण्यास गेले असता तेथे त्याला पत्रकार प्रमोद तिवारी भेटला व सांगु लागला की. तुझे उनलोगोने बोला थाना, वहाँपेही सेंटलमेंट कर दे, अभी देख तु, तेरी गाड़ी कैसी छूटती है!में देखता हूँ, तेरी गाडी यहाँपेही सड़ाता हूँ, मेरी पोहोच उपरतक है ,अब भी २लाख रुपया देता होंगा तो तेरी सेटेलमेंन्ट करवा दूंगा ! नही तो भोग! असे बोलून निघून गेला, असे यतीन पिंपळे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत व्यक्त केले आहे .
म्हणुन तक्रारदार यतीन पिंपळे ह्यांनी बोईसर पोलीस ठाण्यामध्ये १)विजय प्रसाद २) एम.के. अन्सारी ३) दुर्गेश पाठक ४) विकास सिहं ५) प्रमोद तिवारी यांच्याविरुदध कायदेशीर तक्रार केली असुन भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत कलम ३८४,३४१, ४२७,५०४, ५०६ व ३४ दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस अधिकारी धनराज शिरसाट यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
Comments
Post a Comment