पालघर जिल्ह्यात मनाई आदेश लागु :अपर जिल्हादंडाधिकाऱ्याचे आदेश
पालघर जिल्ह्यात मनाई आदेश लागु :अपर जिल्हादंडाधिकाऱ्याचे आदेश पालघर : पालघर जिल्ह्यातील (वसई तालुका वगळून ) हद्दीमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे 1951 चे कलम ३७(१) (३) अन्वये पालघर जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक पालघर यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस हद्दीत दिनांक 29/03/2023 रोजी 00.01 वा. पासून ते दिनांक 11/04/2023रोजी 24.00 वा. या कालावधीपर्यत मनाई आदेश लागू केले आहे. अपर जिल्हादंडाधिकारी पालघर डॉ. किरण महाजन यांनी दिलेल्या आदेशानुसार कलम ३७ (१) नुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे कोणताही दाहक पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ जवळ बाळगणे , दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे यास मनाई करण्यात आली आहे. शिवाय, व्यक्तींची किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक ठिकाणी आरडा ओरड करणे , गाणी म्...