पालघर मध्ये एका मद्यपी शिपायाकडून एका चिमुकल्या मुलीवर उपचार
पालघर मध्ये एका मद्यपी शिपायाकडून एका चिमुकल्या मुलीवर उपचार
पालघर - पालघर आरोग्य विभागाचा रुग्णांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ पुन्हा एकदा उघड झाला आहे. तलासरी तालुक्यातील उधवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका मद्यपी शिपायाकडून एका चिमुकल्या मुलीवर उपचार करण्याचा प्रयत्न केला गेला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हा मद्यपी शिपाई चक्क डॉक्टरचा सल्ला न घेताच या चिमुकलीला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करत होता . मात्र रुग्णाच्या सोबत असलेल्या कुटुंबीयांनी त्याला रोखून धारेवर धरलं .आपण मद्य प्राशन केलं असल्याची कबुली ही शिपायाकडून देण्यात आली असून या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे .
पालघर जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रात्रीच्या वेळी निवासी डॉक्टर राहत नसल्याची ओरड नेहमीच होते. मात्र पालघर जिल्हा परिषद प्रशासन आणि सरकार यावर ठोस कारवाई करण्यात अजूनही अपयशी ठरत असल्याचं वारंवार समोर येत आहे. हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी तातडीने या कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत . तसंच असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी जिल्हा परिषद पूर्ण काळजी घेईल अस आश्वासन देखील प्रकाश निकम यांनी दिलाय .
Comments
Post a Comment