एम.आय.डी.सी च्या विरोधात पाम, कुंभवली, कोलवडे ग्रामपंचायतींचा एल्गार
एम.आय.डी.सी च्या विरोधात पाम, कुंभवली, कोलवडे ग्रामपंचायतींचा एल्गार
बोईसर : तारापुर औद्योगिक क्षेत्रातील बहुतांश भाग हा पाम, कुंभवली, कोलवडे या ग्रामपंचायत हद्दीत येत असून औद्योगिक क्षेत्रातील कारखाना मालकांनी आपला विकास साधत या तीनही गावाकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. याउलट या प्रदुषित कारखान्यांमुळे परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वाढते प्रदुषण ही सर्वात मोठी गंभीर समस्येची बाब निर्माण झालेली आहे अशा परिस्थितीत स्थानीकाना गावात राहण ही कठीण झाले आहे.
या सर्व समस्या बाबत पाम, कुंभवली, कोलवडे ग्रामपंचायतीचे थेट सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी तारापूरातील औद्योगिक विकास महामंडळाच्या उपअभियंताना घेराव घालण्याचा प्रयत्न केला.
एम.आय.डी.सी अस्तित्वात येऊन 50 वर्ष पूर्ण झाले परंतु आजही उद्योगासाठी बेसीक इंफ्रास्ट्रक्चर बनवू शकले नाही त्यामुळे एम.आय.डी.सी तील उद्योजक केमिकल माफियांना हाताशी धरून नैसर्गीक नाल्यात बारमाही हजारों लीटर रासायनिक पाणी सोडण्यात येते त्यामुळे येथील सुपीक शेती नापीक झाली आहे. त्यावर कोणतीही लागवड करू शकत नाही व केमिकल युक्त पाण्यामुळे गावाची परिस्थिति भयानक झाली आहे.
त्यातच सन २०१९ पासून ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कारखान्यातून मिळणारा प्रॉपर्टी टैक्स एम.आय.डी.सी ने स्व:त कडे घेऊन त्यातील ५०% टैक्स ची रक्कम ग्रामपंचायतीकडे देण्यात सुरवात केली त्यामुळे गावाच्या विकासाला खिळ बसली आहे. व देत असलेल्या ५०% टक्के रक्कमेतुन पाण्याचे पैसे परस्पर घेत असल्यामुळे गावाची विकासकामे तर सोडाच पण ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्याचे पगार ही होत नाहीत. त्यामुळे नियोजनशून्य व्यवस्थेमुळे जमीनी नापीक झाल्या व माणसे काय तर गुरेदेखील विहिरीतील अथवा तलावाचे पाणी पिऊ शकत नाही. त्यामुळे गेल्या 3 वर्षात स्वत: कडे घेतलेला ग्रामपंचायत टैक्स च्या हक्काच्या पैशातुन परस्पर घेतलेले पाण्याचे पैसे ग्राम पंचायतीस वर्ग करावे व यापुढे कुठल्याही स्वरूपात परस्पर घेऊ नये व उद्योगाचे कर ग्रामपंचायतीस पुन्हा देण्यासंदर्भात शासन स्तरावरून कार्यवाही व्हावी. तसेच एम.आय.डी.सी ने गावाच्या विकासाकरीता सी.एस.आर फंड येथील बाधित गावाना देण्याकारिता पत्रक काढावे व सक्ति करावी तसेच तारापूर औध्योगिक वसाहतीत कारखान्यात ८०% प्राध्यान्य स्थानिक नागरिकांना नोकरीत घ्यावे .असा शासन आदेश असतानाही कोणतीही कंपनी या आदेशाचे पालन करत नाही त्यामुळे स्थानिक व प्रकल्प ग्रस्त बेरोजगार मुला-मुलीना रोजगार देण्यात यावा भूमिपुत्र न्याय मिळतो की नाही असे पत्रक कंपनीना काढणे .व त्याचा तपशील ग्राम पंचायतींना देण्यात यावे ह्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळावर धडक मोर्चा व ग्रामपंचायत टाळे बंद करून सरपंच हे एम. आय. डी. सी अधिकारी असणार असा स्पस्ट शब्दात तिन्ही ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळाने निवेदन देत इशारा दिला आहे.
यावेळी एम आय डी सी विरोधात झालेल्या या आंदोलनात कुंभवली गावच्या सरपंच ऍड. तृप्ती कुंदन संखे, पाम गावच्या सरपंच दर्शना पिंपळे, कोलवडे गावचे सरपंच कुंजल संखे तसेच उपसरपंच हेमांगी संखे,अमित संखे, मनोज पिंपळे यांसह ग्रामपंचायतीचे सदस्य मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला विशेष म्हणजे या लढ्याला पाठबळ देण्याकरिता जिह्यातील शिवसेनेचे नेते कुंदन संखे यांनीही उपस्थिती देऊन ग्रामस्थांची बाजू मांडली यावेळेस पर्यावरण दक्षता मंचचे मनीष संखे, सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत संखे ही उपस्थित होते.
Comments
Post a Comment