रामनवमी निमित्त नवापुर गावात ग्रामस्थानी केली साफ सफाई
रामनवमी निमित्त नवापुर गावात ग्रामस्थानी केली साफ सफाई
पालघर : पालघर तालुक्यातील नवापुर गावातील ग्रामस्थानी रामनवमी निमित्त गावात साफसफाई करण्यात आली.
आपण प्रत्येकजण आपल्या घराची स्वच्छता करतो त्याप्रमाणेच,आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. त्यामुळे दिनांक 26/03/2023 व 27/03/2023 रोजी असे दोन दिवस दरवर्षी प्रमाणे नवापुर गावात ग्रामस्थानी रामनवमी निमित्त साफसफाई करण्यात आली.नवापुर गावात रामनवमी दिवशी यात्रा उत्साहात साजरी केली जाते यासाठी नवापुर गावात आजू बाजूच्या परिसरातील बरेच लोक गावात येतात त्यामुळे गांव सूंदर आणि स्वच्छ दिसावे या उद्देश्यने गावातील ग्रामस्थानी पुढाकार घेऊन गावात ठीक ठिकाणी तसेच समुद्र किनारी साफसफाई करण्यात आली. यावेळी गावात साफसफाई केल्यामुळे ग्रामपंचायत चे सरपंच अंजली बारी, उपसरपंच खगेश पागधरे, ग्रामसेवक राजेश संखे व ग्रामपंचायत सदस्यानी ग्रामस्थानचे कौतुक करून आभार मानले.
Comments
Post a Comment