बोईसर मधील बजाज हेल्थकेअर ली. कंपनीस भीषण आग : एका युवकाचा मृत्यु

बोईसर मधील बजाज हेल्थकेअर ली. कंपनीस भीषण आग : एका युवकाचा  मृत्यु

कारखान्याच्या निष्काळजीपणामुळे तर अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अजून एक निष्पाप जीवाचा बळी

बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील बजाज हेल्थकेअर ली. हा कारखाना नेहमीच प्रदुषणा बाबतीत चर्चे चा विषय राहिला आहे तर प्रत्येक कारखान्याला प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून काही अटी व शर्तीच्या आधारावर ठराविक उत्पादनाची परवानगी (कसेंट) दिली जाते. परंतु कारखानदार जास्तीच्या नफेखोरीच्या लालसेपोटी परवानगी नसलेले बेकायदेशीर उत्पादन घेत पर्यावरणाची हानी करत निष्पाप कामगारांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याचे दिसत आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक इ -६२/६३ बजाज हेल्थकेअर ली. (वेटफार्मा प्रोडक्ट इं. ली.) या कारखान्यात काल सकाळी ६ वाजून २० मिनिटाच्या सुमारास ६००० किलो लिटर क्षमता असलेल्या ग्लास लाईन वेसल मधे आग लागून त्या आगीच्या भडक्यात होरपळून कंत्राटी पद्धतीवर काम करणारा २८ वर्षीय नागेंद्र गौतम नावाचा युवक गंभीर जखमी झाला होता परंतु आज उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार प्लॉट क्रमांक इ ६३ मधे Glycine नावाचा बेकायदेशीर उत्पादन घेत असताना पहिल्या माळ्यावर असलेल्या ६००० किलो लीटर क्षमतेच्या ग्लास लाईन वेसल मधे ४२०० किलो लिटर Methanol उच्च तापमानात  असताना Monomethyl Chloro Acetate वेसलच्या मेनहोल द्वारे टाकत असताना वेसल मधे आग लागून उघडा असलेल्या मेनहोल मधून आग बाहेर येऊन कामगार नागेंद्र गौतम आगीत होरपळून गंभीर जखमी झाला होता. जखमी झालेल्या नागेंद्र गौतम याला प्रथमतः बोईसर येथील संजीवनी इस्पितळात दाखल करण्यात आले होते.परंतु आगीमुळे ६०% पेक्षा जास्त दुखापत असल्यामुळे संजीवनी इस्पितळातून नवी मुंबई येथील नॅशनल बर्न सेंटर या इस्पितळात दाखल करण्यात आले होते परंतु आज दिनांक 24/03/2023 रोजी उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला आहे.



Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी