सातपाटी पोलीस स्टेशन मधील दाखल घरफोडी गुन्ह्यांतील आरोपीला पकड़ण्यात स्थानिक गुन्हे शाखेला आले यश

सातपाटी पोलीस स्टेशन मधील दाखल घरफोडी गुन्ह्यांतील आरोपीला पकड़ण्यात स्थानिक गुन्हे शाखेला आले यश

तडीपार केलेला निघाला घरफोडी गुन्ह्यांतील आरोपी

पालघर : सातपाटी पोलिस ठाणे येथील दाखल घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

दिनांक 06/02/23 रोजी भुवनेश गणेश राउत (वय 41 वर्ष ) रा. ओहळवाडी, माहिम यांच्या घरात अज्ञात चोरट्यानी घरफोडी करून सोन्याचे दागिने, चांदीचे पैजण व रोख रक्कम असा एकूण 4,20,000/- रूपये चोरी केली म्हणून सातपाटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेवून सातपाटी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आले त्यानुसार पोउपनि / स्वप्निल सावंतदेसाई स्थानिक गुन्हे शाखा,पालघर यांच्या पथकाने कोणतेही धागेदोरे नसताना तांत्रिक पूराव्याच्या आधारे सखोल व कौशल्यपूर्ण तपास करून एक संशयित इसम ( वय 20 वर्ष ) रा. गांधीनगर, पालघर पूर्व सध्या रानपुर जि. सुरेन्द्रनगर, राज्य गुजरात यास ताब्यात घेवून कसून चौकशी केली असता संशयित इसम हा पालघर, ठाणे, मुंबई व नाशिक या जिल्ह्यातुन दोन वर्षासाठी तडीपार केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 अन्वये पालघर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले अटके दरम्यान नमूद आरोपी कडे कसुन चौकशी केली असता सातपाटी पोलीस ठाणे येथे नमूद गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. यात नमूद गुन्ह्यात आरोपीकडून चोरी गेलेला एकुण 4,20,000/- रु. किंमतीचे सोन्याचे दागीने चांदीचे पैजण व रोख रक्कम असा 100 % मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास हा पोउपनि/स्वप्नील सावंतदेसाई, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक पालघर यांचे आदेशान्वये श्रीमती निता पाडवी, उप विभागीय पोलीस अधिकारी पालघर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. अनिल विभुते, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, सपोनि/प्रेमनाथ ढोले, सातपाटी पोलीस ठाणे, पोउपनि/स्वप्नील सावंतदेसाई, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, पोउपनि/मयुरेश अंबाजी, सातपाटी पोलीस ठाणे, पोहवा/दिलीप जनाठे, पोहवा/संजय धांगडा, पोहवा/विजय ठाकूर, पोना/कल्याण केंगार सर्व नेमणूक स्थागुशा, पालघर तसेच पोहवा/सानप, सातपाटी पोलीस ठाणे यांनी संयुक्तरीत्या यशस्वी पार पाडली.



Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी