प्रियकराला झाडाला बांधून त्याच्यासमोर प्रेयसीवर केला सामुहिक बलात्कार
प्रियकराला झाडाला बांधून त्याच्यासमोर प्रेयसीवर केला सामुहिक बलात्कार
पालघर : पालघर जिल्ह्यातील विरार भागात २० वर्षीय तरुणीचे लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
या घटनेप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आपल्या प्रियकरासह जवळच्या डोंगरावर फिरण्यासाठी गेली होती. आरोपींनी त्यांना पाहिलं आणि धमकावण्यास सुरुवात केली. यानंतर आरोपी आणि तरुणामध्ये वाद झाला. तरुणाने बिअरच्या मोकळ्या बाटलीने दोन्ही आरोपींवर हल्ला केला. यानंतर आरोपींनी तरुणाचेही कपडे फाडले आणि त्याला झाडाला बांधलं असं पोलिसांनी सांगितलं. यानंतर आरोपींनी तरुणीला ओढत एका निर्जनस्थळी नेलं आणि बलात्कार केला. आरोपींनी यावेळी पीडित तरुणीची पर्स जाळून टाकली असं पोलिसांनी सांगितलं. पीडित तरुणीने आरोपींच्या तावडीतून पळ काढत घर गाठलं होतं. तर तरुण मात्र झाडाला बांधलेल्या अवस्थेतच होता. तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तरुणाची सुटका केली.
दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, त्यांना न्यायालयाने 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींचं वय 22 आणि 25 वर्ष आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशी आरोपींना अटक करुन स्थानिक दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं. कोर्टाने त्यांना 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला असुन दोन्ही आरोपी विरारच्या साईनाथ नगरमधील निवासी आहे
Comments
Post a Comment